*मराठवाडा पातळीवरील लालबहादूर शास्त्री आंतरशालेय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन.*

*मराठवाडा पातळीवरील लालबहादूर शास्त्री आंतरशालेय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन.*


 


   उदगीरः येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय मागच्या 40 वर्षापासून अखंडितपणे मराठवाडा पातळीवरील लालबहादूर शास्त्रीजींच्या स्मरणार्थ आंतरशालेय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करते.दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या वर्षी ही स्पर्धा *"कोरोना प्रादुर्भावामुळे"ऑनलाइन पद्धतीने* घेण्यात येणार आहे.हे स्पर्धेचं 41वे वर्ष आहे.स्पर्धा *दिनांक 01व 02 ऑक्टोबर 2020* रोजी संपन्न होणार आहे.51 हजार रूपयांची भव्य पारितोषिके असलेली ही स्पर्धा इयत्ता 7वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या स्पर्धेत एक स्पर्धकांने विषयाच्या अनुकूल बाजूने व दुसऱ्या स्पर्धकाने विषयाच्या प्रतिकूल बाजूने विषय मांडणी करणे बंधनकारक आहे.या स्पर्धेचा विषय-"ऑनलाईन शिक्षणपद्धती:शिक्षणासाठी तारक की मारक "हा आहे.वादविवाद स्पर्धेच्या माहितीपत्रकाचं विमोचन स्थानिक कार्यवाह शंकरराव लासुने व मुख्याध्यापक प्रदीपराव कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रंसगी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त शाळेच्या संघांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी , स्पर्धा प्रमुख निता मोरे , सहप्रमुख श्रीपाद सन्मुखे यांनी केले आहे.माहितीपत्रकाच्या विमोचनप्रसंगी पर्यवेक्षक,अंबूताई दीक्षित ,लालासाहेब गुळभिले,अंबादास गायकवाड ,माधव मठवाले,अनिता यलमटे ,रामेश्वर मलशेट्टे व गुरूदत्त महामुनी उपस्थित होते.