लालबहादूर शास्त्री विद्यालयात  पट रचना बैठक संपन्न.

 लालबहादूर शास्त्री विद्यालयात  पट रचना बैठक संपन्न.


    (उदगीर) दि.22/10/2020 रोजी लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे ऑनलाइन पद्धतीने गट पट रचनेची मार्गदर्शनपर बैठक संपन्न झाली.या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष,श्री.मधुकर वट्टमवार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून केशवराज विद्यालयाचे उपमुख्याध्यापक तथा गट पट रचनेचे संस्थेचे संयोजक श्री.सुनिल वसमतकर,तसेच स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह श्री.शंकरराव लासुणे, शालेय समितीचे अध्यक्ष,श्री.रावसाहेब वैद्य,विद्यालयाचे मु.अ.श्री प्रदीपराव कुलकर्णी,शिक्षक पालक संघाचे श्री.सुनील वट्टमवार,शिक्षक पालक संघाचे श्री.सांब शास्त्री, पर्यवेक्षिका,सौ.अंबुताई दिक्षित,पर्यवेक्षक श्री.लालासाहेब गुळभिले,लालबहादूर शास्त्री संस्कार केंद्राच्या गट पट रचनेच्या समन्वयक सौ.निता मोरे व सर्व गटप्रमुखांची उपस्थिती होती.


       प्रमुख मार्गदर्शनात बोलत असताना श्री.सुनील वसमतकर सरांनी सांगितले की भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई ही विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. त्यातला एक शिक्षकांसाठी राबविलेला नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे गट पट रचना होय.ही गट पट रचना भा.शि.प्र.संस्थेचे कार्यवाह श्री.नितीनजी शेटे व श्री.सुनील वसमतकर यांच्या संकल्पनेतील हा एक उपक्रम होय.पुढे ते गट पट रचना म्हणजे काय ? व ती कशासाठी ? हे सांगताना ते म्हणाले की भा.शि.प्र संस्थेच्या विस्ताराचा वटवृक्ष खूप मोठा झाला आहे.त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,संस्था सभासद यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्यामुळे बरेच वर्ष या परिवारात राहून.एकत्र काम करून सुद्धा बऱ्याच वेळा एकमेकांचा परिचय राहत नाही.आपल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबाची माहिती किंवा परिचय सुद्धा नसतो.त्यामुळे आपल्याला एकमेकांच्या अडचणी समस्या कळत नाहीत.तसेच प्रत्येक जण हा विविध सामाजिक,आर्थिक,कौटुंबिक, ग्रामीण,शहरी पार्श्वभूमीचा असतो. त्यामुळे एकत्र काम करताना मनामध्ये कुठेतरी भीतीचे वातावरण असते.त्यामुळे कामाचा ताण निर्माण होत असतो.म्हणून अशावेळी गट पट रचनेमुळे कमकुवत सोबत्याला बळ मिळते. एक विश्वासाचे मोकळे वातावरण निर्माण होते.एकटेपणाची भीती राहत नाही.तसेच हे वर्ष दत्तोपंत ठेंगडी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे दत्तोपंत ठेंगडी यांनी दिलेला समरसतेचा विचार समाजात रुजविण्यासाठी गट पट रचनेमुळे सहज सुलभ होईल.असे मार्गदर्शन केले.त्यानंतर श्री.मधुकर वट्टमवार यांनी अध्यक्षीय समारोप केला.


           या बैठकीचे सूत्रसंचालन प्रास्ताविक,स्वागत व परिचय सौ. निता मोरे,तांत्रिक विभाग श्री.ल.सू.कुलकर्णी तर आभार श्री. प्रदीपराव कुलकर्णी यांनी मानले.


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज