माझे आदर्श गुरू...🙏

माझे आदर्श गुरू...🙏


 माननीय श्री वेंकटेशराव दत्तात्रय देशपांडे. माजी मुख्याध्यापक लालबहादूर विद्यालय तसेच सरदार वल्लभभाई पटेल विद्यालया ची निर्मितीतसेच सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाची निर्मिती केलेले मला अतिशय आदर्श वाटतात. माझ्या कर्तव्य काळामध्ये अतिशय मोलाचे मार्गदर्शन व त्यांचे अनुभव मिळते.


   अगदी निस्वार्थ भावनेने आपले कार्य करत जावे व ईश्वर आपल्याला नेहमी मदत करतो अशी भावना त्यांची असते आणि आम्ही हे त्याच निष्ठेने काम करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर सयंतेंद्रिय..🙏 तसे तिने ज्ञान मिळतो तो यशस्वी होतच असे ज्ञान मला त्यांनी दिले.आपण केलेले कार्य हे ईश्वरी कार्य असते असे समजून केले तर त्याचे फळ अतिशय उत्तम व चांगले भेटते.म्हणून कार्य करत असताना मला प्रत्येक कार्य हे ईश्वरी वाटते अतिशय चांगले मार्गदर्शन मला या गोष्टीतून दिसले जगातील सर्वात मोठी गोष्ट काय असेल तर हेच आहे असे वाटते की कार्य हे ईश्वरी कार्य आहे.जे काही कार्य करणार आहोत ते देश हिताचे आहे असे जर मनात भावना असली तर नक्कीच कार्य चांगली होतात असे मार्गदर्शन मला त्यांच्या कडून भेटले.


जात-पात, गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेदभाव कधीच केलेला त्यांनी मला दिसलाच नाही. देवावर, आपण करत असलेल्या कार्यावर अतिशय श्रद्धा असलेले काका. 


   शेती आणि विद्यार्थी या दोन्हीचा विकास जर केला तर भारत देश कधीच मागे राहणार नाही या विचाराचे माझे गुरु आहेत.


   म्हणूनच मी सुद्धा शिक्षक म्हणून काम करत असताना मुलांना सतत मार्गदर्शन करत असते की कुठलेही काम करावे निष्ठेने. भारत हा कृषिप्रधान देश आहे उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आपण अतिशय चांगली शेती करू शकतो असा विचार त्यांनी सगळीकडे पेरला . विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे म्हणून त्याला कुठल्याही स्वप्नाच्या, प्रलोभानाच्या मागे न लागता केवळ सत्य ,निष्ठा, धर्म, कार्य या गोष्टीचे मार्गदर्शन करुन त्याला एक आदर्श विद्यार्थी बनवावा हा धडा त्यांनी मला दिला.लहान मुलांमध्ये त्यांच्याप्रमाणे वागले पाहिजे.मोठ्यांमध्ये मात्र त्यांच्या चुका खडसावून सांगून त्यांना योग्य मार्गावर आणले पाहिजे हा मंत्र त्यांनी सुंदरी रीतीने समजून सांगितला. आपण कार्य करत असताना अतिशय निष्ठेने एकाग्रतेने केले पाहिजे आणि स्वतः देखील ते तसेच करतात.


वयाने मानाने , मनाने खूप मोठे आहेत परंतु एखाद्या लहान व्यक्तीकडून त्यांना माफी द्यायला काहीच वाटत नाही. नम्रपणे केव्हा आहे एखाद्या गोष्टीबद्दल माफी मागतात कसला मोठेपणा म्हणावा हा!


   एखाद्या व्यक्तीची चूक झाली की अतिशय कडक शब्दांमध्ये बोलतात की ,ती व्यक्ती जन्मात पुन्हा चूक करू नये...आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याला जवळ घेऊन ती चुका झाली कशी झाली सुधारावी कशी अशी समजूत सुद्धा घालतात.


जसे श्रीफळ वरून खडक आणि मध्ये मऊ असते,फणस सुद्धा वरून किती काटेरी दिसतो परंतु आत मध्ये गोड गोड रसाळ फळे मिळतात अगदी तसेच मला माझे गुरु आहेत.


  श्रीमंताला तर कुणीही मदत करतो. परंतु गोरगरिबांना, गरजवंतांना, उपेक्षितांना करणे त्यांना पुढे येणे ,आपल्या सोबत घेणे असे कार्य त्यांनी आपल्या जीवनामध्ये केले आहे.


भाजी घ्यायला गेल्यानंतर भाजीवाला मदत करतात,चप्पल शिवायला गेल्यानंतर चांभाराला मदत करतात, ऑटोत बसल्यावर त्याची घरची परिस्थिती विचारतात, मुलांचा अभ्यास विचारतात. अनोळखी व्यक्तींना सुद्धा लगेच मदत करतात. असे आदर्श व्यक्तिमत्व असलेले पेन्शन,झाल्यानंतर सुद्धा 12 महिन्यातील दोन महिन्याचे पेन्शन लहान मुलांच्या विकासासाठी शाळेला देणगी स्वरूपात देतात. तसेच विद्यार्थ्यांनी काही तरी मागितले तर लगेच त्यांच्यावर त्यांचा वरदहस्त असतोच.


स्वतःचे काम करत असताना अतिशय नियोजनपूर्वक काम करणे व दुसऱ्याला योग्य मार्गदर्शन देऊन प्रवाहात आणणे हे त्यांना आवडते.जर कुठल्याही दिशेने जात असला तरी आपण तसे न जाता केवळ आणि केवळ सत्याच्या मार्गाने चालावे, भले एकटे असले तरी चालेल परंतु सत्याचा मार्ग सोडायचं नाही असा संदेश स्वतःच्या आचरणातून देणारे माझे गुरु वेंकटेशराव देशपांडे काका.


    त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. आईची माया सांगता येत नाही,असेच काकांचे स्वतःचे आचरण एवढे चांगले आहे आज 90 वर्षाचे आहेत त्यांच्या जीवनातील असंख्य चांगल्या गोष्टी, अनेक चांगले विचार, अगणित लोकांना मदत केलेले... मात्र हृदयी असलेले माझे गुरु🙏


      


       सौ. मंजुषा कुलकर्णी.


सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालय उदगीर.


मो. नं.९८८१६९२४३७


Popular posts
*जागतिक वन दिनी जिल्हाधिकारी रमल्या फुलांच्या-पक्षांच्या सान्निध्यात !*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
उदगीरात महिला बचत गटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर संपन्न नगर परिषदेच्या उपक्रम: जागतिक महिला दिनाचे औचित्य
Image
सुधाकर श्रृंगारेच्या विजयासाठी भाजपा युवा मोर्चा सज्ज: जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे.
Image