हातरस घटनेच्या निषेधार्थ उदगीरकरांकडून निदर्शने

हातरस घटनेच्या निषेधार्थ उदगीरकरांकडून निदर्शने


उदगीर: उत्तर प्रदेशातील हतरस जिल्ह्यातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उदगीर शहरवासीयांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने आंदोलन करण्यात आले.


उत्तर प्रदेशातील हतरस जिह्यातील एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. त्यांनतर सदरील महिला उपचारादरम्यान मरण पावली. या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी सदरील महिलेच्या कुटुंबियांना घरात डांबून ठेवत अर्ध्या रात्री मयताच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले. ही सर्व घटना निंदाजनक असून या घटनेचा निषेध करीत उदगीर शहरातील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करावी या मागणीसह उत्तर प्रदेश सरकारचा जाहीर निषेध केला. 


या आंदोलनात डॉ. अंजुम कादरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, शहराध्यक्ष मंजुरखान पठाण, अजित शिंदे, प्रा. डॉ. मारोती कसाब, श्रीनिवास एकुरकेकर, नवनाथ गायकवाड, फैयाज शेख, अनिल मुदाले, नगरसेविका बबिता भोसले, दीपाली औटे, सतीश पाटील माणकीकर, आदर्श पिंपरे, ईश्वर समगे, अमोल घुमाडे, अजीम दायमी, हुसनाबानू शेख यांच्यासह नागरिक, महिला उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
उदगीर मतदार संघात आजपासून स्वाभिमान संवाद यात्रा : अजित शिंदे
इमेज
उदगीरचे दोघे भाऊ गाणगापूरच्या नदीत बुडून ठार : सोबतचा एक मित्र जखमी
इमेज
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर माजी नगरसेवक रामेश्वर पवार यांचे उपोषण मागे
इमेज
निलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर मराठवाड्याचे भूषण : ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज