निटूर आणि राठोडा गावाला शेळीपालन करणार्‍या महिलांना शेळ्यांचे वाटप

 


निटूर आणि राठोडा गावाला शेळीपालन करणार्‍या महिलांना शेळ्यांचे वाटप


निलंगा :  सर्वसामान्य गोरगरिबांना सतत देण्याच्या भावनेतून शेळीपालन करण्यासाठी होतकरु महिलांना मदत म्हणून दोन्ही गावांना मिळून तब्बल दहा शेळ्यांचे वाटप करण्यात आले.ही मदत एल अँन्ड टी फायनान्सियल सर्व्हिसेस, अफार्म पुणे आणि जियामुक्ती मानव सेवा संस्था, लातूर संचलीत डिजिटल सखी प्रकल्पांतर्गत देण्यात आले आहे.


कोरोना संक्रमनातील कालावधीत या संस्थेच्या माध्यमातून अगोदर अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले होते.सर्वसामान्य माणसांची नाळ जोडण्याचे काम ही संस्था करत असल्याने सर्वसामान्य महिला आणि नागरिकांना बळ देण्याचे काम सध्या निलंगा क्लस्टरच्या माध्यमातून हा दैदिप्यमान उपक्रमाच्या सर्वसामान्य महिलांना आधार देण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.निटूर आणि राठोडा गावाला तब्बल संयुक्तरित्या दहा शेळीपालन करण्याच्या माध्यमातून महिलांना आधार देण्यात आले आहे. कोरोना संक्रमनामुळे हा उपक्रम सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर करुन करण्यात आला आहे.


याप्रसंगी अध्यक्ष पवार, पञकार राजाभाऊ सोनी, अफार्मचे पशुधन अधिकारी डाॅ.राजेश कातोरे,क्लस्टर व्यवस्थापक आदिनाथ चलवाड,डिजिटल सखी स्वाती आंबेगावे, आरती जगदाळे,रोशनी साठे, संगीता डोंगरे,सारिका करंजे,मनिषा शेळके,मिना कांबळे,कृषी दूत दत्ता करंजे यांच्या उपस्थितीत शेळीपालनाचे वाटप करण्यात आले.