जिव्हाळा ग्रुपच्या वतीने दशरथ शिंदे यांचा सत्कार
उदगीर: संजीवनी विद्यालय चापोली येथे दिर्घकाळ सेवा बजावून निवृत्त झालेले येथील जिव्हाळा ग्रुपचे सदस्य प्रा. दशरथ शिंदे यांचा उदगीर येथील जिव्हाळा गृपच्या वतीने सपत्नीक करण्यात आला.
निडेबन येथील राधाकृष्णन विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, प्राचार्य बी. टी. लहाने, निडेबनचे उपसरपंच सुनील सोमवंशी, नगरसेवक राजकुमार भालेराव, जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष देविदासराव नादरगे, उपाध्यक्ष विश्वनाथ बिरादार माळेवाडीकरउपस्थित होते . व्यासपीठावर सत्कारमूर्ती प्रा. दशरथ शिंदे सौ.पुष्पाताई शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रामचंद्र तिरुके यांनी प्रा. दशरथ शिंदे यांनी आपल्या शिक्षकी पेशेच्या काळात अनेक विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करून अनेक पिढया घडविण्याचे काम केले आहे. आता पुढील आयुष्यात त्यांनी समस्त समाजाच्या हितासाठी काम करावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात विश्वनाथ मुडपे यांनी प्रा. दशरथ शिंदे यांनी आपल्या जगण्यातून सामाजिक ऐक्य जपल्याचे सांगत भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष देवीदासराव नादरगे यांनी केले. सूत्रसंचालन विवेक होळसंबरे यांनी केले तर आभार व्ही. एस. कुलकर्णी यांनी मानले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा