अटल वॉक वे ची अरविंद पाटील यांच्याकडून पाहणी

अटल वॉक वे ची अरविंद पाटील यांच्याकडून पाहणी


:निलंगा शहराच्या सौन्दर्यात भर घालणारा व नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठीचा महत्वपुर्ण प्रकल्प:


लवकरच उद्घाटन: नगराध्यक्ष शिंगाडे


निलंगा : माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या अटल वॉक वे या प्रकल्पाला भेट देऊन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी पाहणी केली. व उर्वरीत कामे त्वरित पूर्ण करावीत अशा पालिकेला सूचना केल्या. दरम्यान लवकरच या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी सांगितले.


निलंगा नगर परिषदेच्या वतीने माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून अटल वॉक वे हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. शहराच्या पूर्वेला तेरणा कॉलनीच्या जवळ हा प्रकल्प उभारला जात आहे. या परिसरात अतिशय आल्हाददायक वातावरण असून सायंकाळ च्या सुमारास शहरातील बालगोपाळाना व वृद्ध मंडळींना विरंगुळासाठी हे महत्वाचे ठिकाण बनले आहे. शिवाय पहाटे रस्त्यावर फिरणाऱ्या व व्यायाम करणाऱ्या मंडळींची देखील या अटल वॉक वे मुळे मोठी सोय झाली आहे. अनेक सुख सुविधांनी युक्त असलेल्या या निसर्ग रम्य वातावरणात वेळ घालविणाऱ्यांसाठी हा प्रकल्प आरोग्यदायी ठरणार आहे. 


निलंगा शहराच्या विकासात व सौन्दर्यात भर टाकणारा हा प्रकल्प असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले आहे.


दरम्यान नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी येत्या दोन महिन्यांत अटल वॉक वे प्रकल्पासह शहराला 24 तास पाणीपुरवठा करणारी योजना व सर्व सुख सोयींनी युक्त अशा टाऊन हॉल चे उदघाटन करण्यात येणार असल्याचे सांगितले.


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज