शिवसेना तालुका उपप्रमुख प्रशांत मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

शिवसेना तालुका उपप्रमुख प्रशांत मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश


उदगीर [प्रतिनिधी ]


महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना तालुका उपप्रमुख प्रशांत सुभाषराव मोरे देवर्जनकर यांनी देवर्जन सर्कल मधील सर्व शिवसेना शाखा प्रमुखासह प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या अजीत जाधव - करवंदी, रवी पाटील -हेर, योगेश बिरादार, जलील शेख, विकास बिरादार - धोतरवाडी, दस्तगीर पठाण, दस्तगीर लासुणे, मेहताब बागवान, तानाजी पिटले, संतोष कांबळे, परवेज मुन्शी, प्रवीण गडदे, मुन्ना श्रीवास्तव, राजकुमार गिलचे, माधव हैबतपूरे, मुकेश भोसले, सिद्धार्थ गिलचे, बळीराम जाधव या सर्व शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, शहराध्यक्ष समिर शेख, प्रा. श्याम डावळे, महिला शहराध्यक्षा दीपाली औटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.काँ.पा.चे सक्रिय कार्यकर्ते शफी हाशमी, रा.काँ.पा. मौलाभाई शेख, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गिलचे, तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, शहराध्यक्ष प्रेम तोगरे, तालुका उपाध्यक्ष शालीवान सोनकांबळे, धोंडीबा कांबळे, सिद्धार्थ मसुरे, समाधान सूर्यवंशी, राजरत्न सूर्यवंशी, धीरज वाघमारे, बबलू मसुरे, दीपक गायकवाड, अझरोद्वीन शेख, सलीम शेख, सोनू हाशमी, यांनी परिश्रम घेतले.


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'शिवस्वराज्य यात्रा' बुधवारी उदगीरात....*
इमेज