कै. रसिका महाविद्यालयाच्या उपक्रमाची केंद्र शासनाकडून दखल*

कै. रसिका महाविद्यालयाच्या उपक्रमाची केंद्र शासनाकडून दखल*


देवणी : कै.रसिका महाविद्यालयाच्या क्रीडा विभागामार्फत व केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअरस ऍड स्पोर्ट्स (Ministry of Youth Affairs and Sports )यांच्या मार्फत फिट इंडिया FIT INDIA RAN ) हा उपक्रम 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये राबविण्यात आला आहे. हा उपक्रम समाजातील सर्व वयोगटातील पुरुष आणि महिलांसाठी होता प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 3 किलोमीटर धावणे किंवा चालणे गरजेचे होते. स्वतःच्या मोबाईल मध्ये पेडो मिटर अॅप डाऊनलोड करून रोज किती धावता किती चालतात याचे मोजमाप केले जात होते. त्याच्या शेवटच्या दिवशी स्क्रीन शॉट काढून अपलोड केला गेला होता त्या आधारावर ती कोणती व्यक्ती किती किलोमीटर चालली किंवा धावली आहे. ही सर्व माहिती केंद्र शासनाच्या फिट इंडिया पोर्टल वर भरली गेली होती. हा उपक्रम भारतातील निवडक महाविद्यालयाने राबवला आहे. त्यात कै. रसिका महाविद्यालयाचा समावेश आहे. या उल्लेखनीय कामाबद्दल


केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअरस ऍड स्पोर्ट्स ( Ministry of Youth Affairs and Sports ) मार्फत महाविद्यालयास प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. या उपक्रमाचे संयोजन क्रीडा संचालक डॉ. सचिन चामले यांनी केले व हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. 


या यशाबद्दल संस्थाअध्यक्ष मा.श्री गोविंदरावजी भोपणीकर साहेब, संस्थासचिव मा.श्री. गजाननजी भोपणीकर साहेब, प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे सर, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. सचिन चामले यांचे अभिनंदन केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इमेज