किनगावच्या आरोग्य केंद्रांचे जिल्हा परिषद अध्यक्षांकडून आॕपरेशन* *अस्वच्छता व दारूच्या बाटल्या आढळून आल्यामुळे तिन्ही सेवकांच्या वार्षिक वेतनवाढी रोखण्याचे दिले आदेश*

*किनगावच्या आरोग्य केंद्रांचे जिल्हा परिषद अध्यक्षांकडून आॕपरेशन*


*अस्वच्छता व दारूच्या बाटल्या आढळून आल्यामुळे तिन्ही सेवकांच्या वार्षिक वेतनवाढी रोखण्याचे दिले आदेश*


किनगाव : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सोमवारी किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासअचानक भेट दिली तेव्हा धक्कादायक बाबी समोर आल्या. रुग्णांवर उपचार करणारे हे आरोग्यकेंद्रच आजारी पाहून संतापलेल्या अध्यक्षांनी तीन कर्मचा-यांना निलंबित करण्याची शिफारस करीत येथील सा-या व्यवस्थेचे आॕपरेशन केले.


त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती श्री रोहिदास वाघमारे, किनगाव चे जिल्हा परिषद सदस्य श्री अशोक काका केंद्रे, अहमदपुर पंचायत समितीचे उपसभापती बालाजी गुट्टे यांच्यासह पत्रकार बंधु व ग्रामस्थ उपस्थित होते यांच्या सर्वांच्या समक्ष प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली असता प्रथम दर्शनी खूपच अस्वच्छता दिसून आली. 


वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कक्षा पासून ते फार्मासिस्टची रूम, प्रसुतिगृह, औषध भांडार, जनरल वॉर्ड या सर्वांची पाहणी केली असता प्रत्येक कक्षाचे कोपरे, खिडक्या त्यांच्या पाठीमागे थुंकून लाल झालेल्या भिंती दिसून आल्या. काही कर्मचारी स्वाक्षरी करून निघून जातात अशा तक्रारी मध्ये तथ्य आढळून आले. हालचाल रजिस्टर दोन महिन्यापासून खराब झाले असून फाटलेल्या अवस्थेत दिसून आले.खूप अस्वच्छता दिसून आली, जनरल वॉर्डमध्ये सिगरेट पिऊन थोटूक टाकलेले पाकीट दिसून आले, धक्कादायक बाब तेव्हा घडली, जेव्हा एका रूम मध्ये पाण्याचा फिल्टर च्या बाजूला दारू पिऊन रिकामी झालेली बॉटल आढळून आली, आरोग्य केंद्रात तीन सेवक असतानाही स्वच्छतेच्या बाबतीत कमालीची उदासीनता दिसून आली. तीनही सेवक प्रत्यक्ष कुठलेच काम न करता धूम्रपान करतात, मद्यपान करतात अशा तक्रारी मध्ये तथ्य आढळून आले, त्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ह्या अस्वच्छतेबद्दल तालुका आरोग्य अधिकारी ,वैद्यकीय अधिकारी यांची कान उघाडणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केली.तात्काळ पंचनामा करून तीनही सेवकांवर कडक कारवाई करून त्यांच्या 1 वार्षिक वेतनवाढ बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री राहुल केंद्रे यांनी दिले आहेत. या भेटी वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती श्री रोहिदास वाघमारे, किनगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केंद्रे, अहमदपूर पंचायत समितीचे उपसभापती श्री बालाजी गुट्टे, पत्रकार शृंगारे शेटीबा, रुद्रा मुरकुटे, गोरख भुसाळे यांच्यासह ग्रामसेवक, ग्रामस्थ आदी सह सर्वजण उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
इमेज
आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
इमेज
*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज