आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार


उदगीर: कोरोणा विषाणू च्या वाढत्या प्रादुर्भाव काळात कोविड रुग्णालयात उत्कृष्ट सेवा करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, व इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.


उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात झालेल्या सत्कार कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी तथा कमांडिंग ऑफिसर प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधीक्षक तथा बाह्य संपर्क अधिकारी डॉ. सतिष हरिदास, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष कापसे हे उपस्थित होते. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. 


कोरोणाच्या विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरणा बाधित रुग्णांवर केलेल्या योग्य उपचारामुळे व कोरोणा बाधितांना दिलेल्या योग्य सेवा सुविधेमुळे कोरोणा बाधितांची संख्या कमी होण्यास मदत झाली असे गौरवोद्गार प्रवीण  मेंगशेट्टी यांनी काढले.


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उदगीर शहराध्यक्षपदी सरोजा वारकरे
इमेज