आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबाचे निलंगेकरांकडून सांत्वन

आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबाचे निलंगेकरांकडून सांत्वन


 


सत्ताधा-यांना जबाबदारीचा विसर-संभाजीराव पाटील निलंगेकर


उदगीर (प्रतिनिधी)


वाढवणा(खु) व करखेली येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांत्वन केले.सत्ताधारी मंडळींना जबाबदारीचा विसर पडला असून आपत्ती आलेल्या कुटुंबांना भेट देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.


मागील काही दिवसापूर्वी उदगीर तालुक्यातील वाढवणा बु व करखेली येथील शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या होत्या.जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी या दोन्ही कुटुंबियांची भेट घेऊन दोन्हीही कुटुंबांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.गोपीनाथराव मुंडे सहायता योजनेअंतर्गत या दोन्ही कुटुंबांना मदत देण्याचे त्यांनी सुचित केले.सत्ताधारी मंडळी सत्तेच्या खेळात गुंग असून त्यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही.आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पिडीतांना भेट देण्यासही त्यांच्याकडे वेळ नाही यावरून त्यांची असंवेदनशिलता दिसून येते अशा शब्दांत आ.संभाजीराव पाटील यांनी खंत व्यक्त केली.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे जि.प.उपाध्यक्ष सौ.भारतबाई साळुंके, दगडूसाहेब साळुंके,भगवानराव पाटील तळेगावकर,जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके,जिल्हा उपाध्यक्ष पंडित सुकणीकर, भाजपा शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर,माजी पं .स.सभापती विजय पाटील,नगरसेवक गणेश गायकवाड हे उपस्थित होते.


Popular posts
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
माझे आदर्श गुरू...🙏
Image
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image