योगी सरकारकडून लोकशाहीची हत्या : कल्याण पाटील : उदगीर येथे काँग्रेस कडून निदर्शने 

योगी सरकारकडून लोकशाहीची हत्या : कल्याण पाटील


उदगीर येथे काँग्रेस कडून निदर्शने 


उदगीर : उत्तर प्रदेशातील पीडित महिलेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा उदगीर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांनी योगी सरकार कडून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप यावेळी केला.


उत्तर प्रदेश शाळातील हाथरस जिल्ह्यात एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या अत्याचारानंतर सदरील महिला उपचार सुरू असताना मरण पावली. या पीडित महिलेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना काँग्रेसचे राष्ट्रीय माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी , महासचिव प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रस्त्यातच अडवून धरले, शिवाय त्यांच्यासोबत धक्काबुक्कीही केली. हा प्रकार निंदाजनक असून या घटनेचा काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे यावेळी कल्याण पाटील यांनी सांगितले.


काँग्रेस पक्षाच्या वतीने उदगीर येथील शिवाजी चौकात करण्यात आलेल्या निदर्शने आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजूर खान पठाण, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल कांडगिरे, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास एकुर्केकर, नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती मेहबूब शेख, नगरसेवक फैजू खान पठाण, अनिल मुदाळे, पाशा बेग, माजी नगरसेवक विजयकुमार चवळे, आदर्श पिंपरे, धनंजय मुळे, यशवंत पाटील, सतीश पाटील मानकीकर आदिंसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज