अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींनी "बेगम हजरत महल शिष्यवृत्तीचा" लाभ घ्यावा:- अहमद सरवर

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींनी "बेगम हजरत महल शिष्यवृत्तीचा" लाभ घ्यावा:- अहमद सरवर


उदगीर: केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय मान्यताप्राप्त मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन द्वारे अल्पसंख्यांक समाजातील मुलींना "बेगम हजरत महल शिष्यवृत्ती" साठी आॅनलाईन अर्ज मागवणे सुरु आहे. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींने या शिष्यवृत्ती चा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक अहमद सरवर यांनी केले आहे.


मुस्लिम,बौद्ध,शीख,पारशी,जैन व इसाई या अल्पसंख्यांक समाजातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून बेगम हजरत महल शिष्यवृत्ती दिली जाते. इ. ९ वी ते १२ वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतगर्त ९ वी व १० वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना वार्षिक ५००० रुपये तसेच इ. ११ वी व १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ६००० रुपये ची आर्थिक मदत दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागवणे सुरु आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख "३१ ऑक्टोबर २०२०" आहे. अर्ज दाखल करण्यासाठी http://bhmnsmaef.org या संकेतस्थळावर भेट द्या किंवा आपल्या शाळेच्या मुख्याधिपकांशी संपर्क साधा. अल्पसंख्यांक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन अहमद सरवर यांनी केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज