शरद पवार विचार मंच व राष्ट्रवादी युवक शहर निलंगा व राष्ट्रवादी शहर विद्यार्थी आघाडीचा पुढाकार : विविध मागण्यासाठी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन

शरद पवार विचार मंच व राष्ट्रवादी युवक शहर निलंगा व राष्ट्रवादी शहर विद्यार्थी आघाडीचा पुढाकार


विविध मागण्यासाठी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन


 


निलंगा: येथील शरद पवार विचार मंच, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.


डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा सदोष व निकृष्ट बसवल्यामुळे उच्च स्तरीय चौकशी नेमुन कार्यवाही करण्यात यावी व नवीन पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा,यासंबंधी जिल्हाधिकारी व जिल्हा नगर प्रशासन अधिकारी सतिश शिवणे यांनी लक्ष घालावे, केंद्र सरकारने मराठा आरक्षणावरिल स्थगिती उठवून तामिळनाडू च्या धरतीवर तात्काळ मराठा आरक्षण लागू करावे व तसा अध्यादेश लोकसभेत व राज्य सभेत मंजुर करावा, महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी केंद्र शासनास मराठा आरक्षण देण्यास भाग पाडावे अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अटल पथ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे चौकशी समिती नेमुन कार्यवाही करावी, निलंगा शहरातील गल्ली बोळातील अंतर्गत रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत , पाणी पुरवठा वेळेवर करावा शहरात स्वच्छता अभियान राबवावे व नागरिकांना सुविधा पुरविण्यात याव्यात, सरसकट शेतकर्यांना विमा कंपनी तर्फे अतिवृष्टी ची नुकसान भरपाई द्यावी व शेतकरी वर्गास न्याय द्यावा व केंद्र सरकारने मंजुरी केलेले शेतकरी विरोधी विधेयक रद्द करावे, निलंगा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नगर अभियंता कैलास वारद यांच्या मनमानी कारभारामुळे निलंगा शहरवासिय त्रस्त आहेत यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी, शहरातील कचरा व्यवस्थापन हाडगा मोडवरिल चे डंपिंग ग्राऊंड लवकरात लवकर हलविण्यात यावे, रमाई घरकुल योजने मध्ये जास्ती चा आकारला जाणारा कर रद्द करावा या व इतर मागण्यासाठी शरद पवार विचार मंच निलंगा , शहर राष्ट्रवादी युवक व शहर राष्ट्रवादी विद्यार्थी च्या संयुक्त विद्यमाने आज धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा नोंदविला. 


या आंदोलनात शरद पवार विचार मंच निलंगा चे तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष सुधीर मसलगे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, तालुका कार्याध्यक्ष अंगद जाधव, जीवन तेलंग, संदीप मोरे, राम पाटिल, पंढरी पाटिल, दयानंद मोरे, सुरेश रोळे,नानासाहेब पाटिल, महिला आघाडीच्या महादेवी पाटिल,तालुका अध्यक्ष रुक्मिणी कांबळे, नवनियुक्त शरद पवार विचार मंच च्या युवती शहराध्यक्ष कु. राधा जगताप, सुंगधा जगताप, सुलक्षणा जगताप, लक्ष्मण क्षिरसागर, महेश मसलगे, विद्यार्थी चे जिल्हा सरचिटणीस सुरज जाधव शहराध्यक्ष सुमित जाधव, विकास ढेरे, सुग्रीव सुर्यवंशी, गणीमामु खडके, गफ्फार लालटेकडे, संजय सोनकांबळे, लक्ष्मण कांबळे, बालाजी जोडतले, बालाजी शिंदे, माधव कांबळे, शाहुराज बेंडगे राजेश माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. 


दिवसभराच्या धरणे आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी विकास माने यांना निवेदन देण्यात आले. आंदोलन चा समारोप राष्ट्रवादी युवक चे माजी तालुका अध्यक्ष संदिप मोरे यांनी केला.


Popular posts
*महासंस्कृती महोत्सव अंतर्गत 'मराठी बाणा' कार्यक्रमाला उदगीरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद* ▪️क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Image
15 फेब्रुवारी रोजी उदगीर येथे महाविकास आघाडीचा महामोर्चा
Image
केंद्रीय मंत्री रुपाला 29 जानेवारी रोजी उदगीरात उदगीरची अस्मिता असलेल्या दूध डेअरीची पाहणी करणार : खा. शृंगारे यांची माहिती
Image
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
Image