🌸 सरदार वल्लभाई पटेल लोहपुरुष🌸

🌸 सरदार वल्लभाई पटेल लोहपुरुष🌸 आज दिनांक 31 /10 /2020 रोजी भारतातील प्रखर व तेजस्वी असलेले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्याबद्दल लिहिण्यासाठी लेखणी हातात घेतली. आकाशात चमकणारा तारा ,भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे महापुरुष, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि आपल्या भारत देशाचे महान स्वातंत्र्य सैनिक असणारे, स्वतंत्र भारताचे उपप्रधान मंत्री या रूपात त्यांनी भारतीय संघा समवेत शेकडो रहिवाशी राज्यांचे विलीनीकरण केले .आहो त्यांच्या अविश्वसनीय आणि अद्भुत कौशल्यआणि नीतीगत दृढतेमुळे त्यांना' लोहपुरुष' म्हटले जाते.


  खरोखरच ,जीवनात कितीही संकटे आली तरी खंबीरपणे संकटांना सामोरे जाऊन ते संकट प्रयत्नपूर्वक दूर करणे याचेच नाव सरदार वल्लभाई पटेल आहे. अशा या कर्तुत्ववान सरदार यांचा जन्म नाडियाद


 येथे 31 ऑक्टोबर 1 875 रोजी एका जमीनदार कुटुंबात झाला त्यांच्या आईचे नाव लाड बाई वडिलांचे नाव झवेरभाई पटेल होते. त्यांना तीन भाऊ होते व एक बहीण दहीबा पटेल ही होती.


लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांना लाभली होती, त्याकाळी बालविवाहाची प्रथा होती म्हणून वल्लभभाई पटेल यांचा विवाह सोळाव्या वर्षी झावेरबा नावाच्या कन्येशी झाला.


    भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ या विचारांचे सरदार पटेल होते .आपले प्रारंभिक जीवन त्यांनी गुजराती मीडियम स्कूलमधून पूर्ण केले पुढे सरदारांनी इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश घेतला व शिक्षण पूर्ण करण्याकरिता त्यांना विलंब लागला वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले परंतु घरची परिस्थिती कठीण असल्याने महाविद्यालयात न जाता वल्लभभाई घरी राहूनच पुस्तके घेऊन शिक्षण घेतले व तसेच जिल्हाधिकारी होण्याकरिता दिल्या जाणाऱ्या परीक्षेचा अभ्यास सुद्धा त्यांनी घरी राहूनच केला व या परीक्षेत सर्वात जास्त गुण त्यांनी पटकावले.


       खरोखरच त्यांच्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, त्यांच्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे.


    अहो अतिशय तल्लख बुद्धी त्यांची होती' Law' पदवी मिळवण्याकरता ते इंग्लंडला गेले व 36 महिन्याचा कोर्स त्यांनी तीस महिन्यांमध्ये पूर्ण केला इंस ऑफ कोर्ट मधून वकिलीची पदवी त्यांनी प्राप्त केली ,या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून कॉलेजमधून पहिले आले लहानपणापासूनच संघटन कौशल्य असणार्‍या पटेल यांना साहस आणि राष्ट्रभक्ती त्यांच्या वडिलांकडून पिढीजात मिळाली होती ते म्हणायचे,"faith is of no avail in absence of strength, faith and strength both are essential to accomplish any great work."


     अहो इतकंच नाही तर बार्डोली तालुक्यातील कर आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले येथून त्यांना 'सरदार' ही उपाधी मिळाली व तसेच स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सरदार वल्लभाई पटेल यांना देश स्वतंत्र झाल्यानंतर गृहमंत्री पद देण्यात आले भारतात सामील होण्यास नकार देणाऱ्या संस्थांवर त्यांनी सैनिक कारवाई करून आपल्यातील पोलादी पुरुष दाखवून दिला. देशाची एकता आणि स्वातंत्र्याचे रक्षण हे त्यांच्या जीवनाचे लक्ष होते. देशाच्या एकतेसाठी या महान नायकांने हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून गेलेले वैभव पुन्हा मिळवून देण्याचे कार्य ही सरदार पटेल यांनी केले.


     " धन्य धन्य ती माता जिने या लोह पुरुषाला जन्म दिला देशाच्या गौरवासाठी त्यांने आपला जीव पणाला लावला".


   15 डिसेंबर 1950 रोजी हा महान पुरुष अनंतात विलीन झाला. संपूर्ण भारतामध्ये शोक कळा पसरली. यानंतर त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


   आमच्या विद्यालयाचे नाव सरदार वल्लभाई पटेल असे ठेवण्यात आले कारण आमच्या विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी हा सरदार पटेलांसारख्या पोलादी पुरुष व्हावा व त्यांच्यासारखे आपले भविष्य उज्वल करावे. ही भावना ठेवून आमच्या राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ संस्थेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आमच्या विद्यालयाला सरदार वल्लभाई पटेल असे नाव दिले,"लोहपुरुष की ऐसी छवि, न देखी की न सो ची कभी, आवाज मी सिंह सी दहाड थी,


   हृदय मे,


 कोमलता की पुकार थी, एकता का स्वरूप जो इस ने रचा, देश का मानचित्र पल भर मे बदला,


 गरीबो का सरदार था वो, दुश्मनों के लिए लोहा था वो, इतिहास के गलियारे खोजते है जिसे , ऐसे सरदार लोहपुरुष थे वो.!


                  धन्यवाद🙏


 


सौ.राच्चमा रमेश मळभागे


 सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालय उदगीर.