*औरादच्या ग्रामीण रुग्णालयाचे काम लवकरच मार्गी लागणार: आरोग्य मंत्री राजेश टोंपे यांनी दिले आदेश


राष्ट्रवादी युवक चे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रयत्नाना यश...


औराद (शहाजनी) येथील ग्रामीण रुग्णालयाचे निधी अभावी अडगळीत पडलेले काम व कर्मचारी यांची कमतरता यामुळे इमारत वापरामुळे राहिली असुन त्या करिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आरोग्यमंत्री राजेश टोंपे यांच्या कडे पाठपुरावा केला व त्यांनी रुग्णालय निधी उपलब्ध करुन चालू करण्याचे व करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले. यामुळे मागील २ वर्षापासून ची औरादकरांची प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येईल. 


यावेळी अौराद (श)येथे अवकाळी पावसाचा पाहणी दौरा ही सुरज चव्हाण यांनी केला व शेतकरी वर्गास नुकसान भरपाई साठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. 


*अंबुलगा (मेन) येथील रुग्णालयासही मिळणार नविन अॅंब्युलन्स: सुरज चव्हाण यांनी सरपंच सुभाष शिंदे यांना दिली ग्वाही*


अंबुलगा (मेन) येथे राष्ट्रवादी चे युवा नेतृत्व आमदार रोहीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार विचार मंच निलंगा युवक चे कार्याध्यक्ष यांनी फळवाटपाचा कार्यक्रम केला. यावेळी राष्ट्रवादी युवक चे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण कार्याध्यक्ष उपस्थित होते. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांनी पाणीपुरवठा व प्राथमिक आरोग्य केंद्र अंबुलगा येथे अॅंब्युलन्स व इतर सुविधा ही पाठपुरावा करुन पुर्ण करण्याचे आश्वासन सुरज चव्हाण यांनी दिले. 


यावेळी सरपंच सुभाष शिंदे, शरद पवार विचार मंच चे तालुका अध्यक्ष सुधीर मसलगे, कार्याध्यक्ष अंगद जाधव, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव शिंदे, संदिप मोरे, किसन पाटिल, राहुल झरे, कुनाल सगर, शरद पवार विचार मंच चे युवक तालुका अध्यक्ष सचिन चव्हाण, सुग्रीव सुर्यवंशी उपस्थित होते. युवक कार्याध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी आभार मानले.


Popular posts
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
माझे आदर्श गुरू...🙏
Image
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image