महिलेवर अत्याचार करणाऱ्या फाशीवर लटकवा!*
*काँग्रेसचे नेते राहुलजी गांधीना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ निलंग्यात आंदोलन...*
निलंगा(प्रतिनिधी):-उत्तरप्रदेश मधील हाथरस गावांत लोकशाहीला काळिमा फासणारी दुर्दव्य घटना घडली. दलित कुटुंबातील महिलेवर नराधमांनी अत्याचार करून त्याची जिभ कापवून घाणारडं कृत्य केले. ते कमी होते की काय योगी सरकारच्या सूचनेनुसार अन्याय अत्याचाराची बळी पडलेली महिला वेळेवर उपचार न झाल्याने शेवटी त्याचा मृत्यू झाला आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित कुटुंबियांना नजरकैदेत ठेवून त्याच्या प्रेतावर पेट्रोल टाकवून जाळून खाक केले. जिवंत असताना अत्याचार आणि मेल्यानंतर ही त्याच्या प्रेतावर अंत्यसंस्कार ही करण्यात आला नाही..सदरील घटनेचा निषेध देशभरात होत असताना हाथरस घटनेतील पीडित कुटुंबाच्या सांत्वन भेटीला निघालेले काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा खासदार राहुलजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारच्या सूचनेवरून पोलिसांनी लोकशाहीचा गळा दाबून कायद्याच्या उल्लंघन करत राष्ट्रीय नेत्याला अपमानास्पद वागणूक देत खासदार राहुल गांधींना पोलिसांनी धक्काबुक्की करत कॉलरला धरून जमिनीवर पाडले ही घटना निंदनीय असून सदरील घटनेच्या निषेधार्थ निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणा देऊन मोदी सरकार व योगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पिडीत कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी घटनेतील सर्व आरोपीना तात्काळ अटक करून त्यांना फाशीसी शिक्षा व्हावी.योगी सरकारने पोलिसांना हाताशी धरून जे पीडित कुटुंबियांवर मानसिक दबाव आणून कुटुंबीयांचा सांत्वन करण्यासाठी येणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांना अपमानस्पद वागणूक दिली अश्या कटपुतली पोलिसांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे निलंगा तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात आली...
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी निलंगा यांना निवेदन देण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ,लातूर जि.दूध महासंघाचे चेररमन प्रा-राजेंद्र सूर्यवंशी,अ.पा.मि.मंडळ लातूर जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे,शहरअध्यक्ष महंमदखा पठाण,अल्प.कॉ.वि.स.अध्यक्ष असगर अन्सारी, कॉ.सोशल मिडिया चे प्रमुख प्रा-गजेंद्र तरंगे,म.प्र.कॉ.कमिटी सदस्य पंकज शेळके,
अध्यक्ष,अल्प.कॉ.वि.स.लाला पटेल, सरचिटणीस,नि. विधानसभा युवक काँग्रेसचे अमोल सोनकांबळे,मा. नगरसेवक सिराज देशमुख अशोक शेटकार,अमित नितनवरे,गोविंद सूर्यवंशी,वसीम अत्तार,रोहन सुरवसे,मुनिर कादरी,नागनाथ घोलप,श्रीमंत बोलसुरे,शेख इस्माईल,दादाराव जाधव,मेनुद्दीन मणियार,देशमुख मुजाहिद इत्यादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.