रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या अध्यक्षपदी प्रमोद शेटकार तर सचिवपदी रविंद्र हसरगुंडे

 रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या अध्यक्षपदी प्रमोद शेटकार तर सचिवपदी रविंद्र हसरगुंडे 

उदगीर(प्रतिनिधि):- येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या सन 2021-22 वर्षासाठी अध्यक्षपदी रो. प्रमोद शेटकार यांची तर सचिवपदी रविंद्र हसरगुंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच याप्रसंगी संपूर्ण संचालक मंडळाचीही निवड करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी रो. मंगला विश्वनाथे, कोषाध्यक्षपदी रो. मिलिंद मुक्कावार, सहसचिवपदी रो. सरस्वती चौधरी, क्लब ट्रेनरपदी रो. संतोष फुलारी आदींची निवड करण्यात आली आहे. त्याचसोबत मेंबरशीप डायरेक्टरपदी रो. महानंदा सोनटक्के, रोटरी फाऊंडेशन डायरेक्टरपदी रो. विजयकुमार पारसेवार, क्लब प्रशासनपदी रो. अॅड मंगेश साबणे, सेवाप्रकल्प संचालकपदी रो. कीर्ती कांबळे व रो. रामदास जळकोटे, पब्लिक इमेज डायरेक्टरपदी रो. विशाल जैन, डायरेक्टर न्यू जनरेशन म्हणून रो. डॉ. मोहन वाघमारे, डिस्ट्रिक्ट एम्फसिस डायरेक्टरपदी रो. अॅड. विक्रम संकाये, आर. आय. एम्फसिस डायरेक्टरपदी रो. ज्योती डोळे, होकेशनल सर्विस डायरेक्टरपदी रो. प्रशांत मांगुळकर, लिटरसी डायरेक्टरपदी रो. डॉ. विश्वास साळुंके, ह्यूमन डेवलपमेंट डायरेक्टरपदी रो. डॉ. दत्तात्रय पाटील, पल्स पोलिओ डायरेक्टरपदी रो. शिवप्रसाद बोळेगावे, विन्स चेअरमनपदी रो. विद्या पांढरे, फेलोशिप डायरेक्टरपदी रो. राजगोपाल मनीयार व रो. सुनीता मदनुरे, इंटरनॅशनल सर्विस डायरेक्टरपदी रो. रामेश्वर निटूरे, पर्यावरण संचालकपदी रो. ज्योती चौधरी, कम्यूनिटी डेव्हलपमेंट संचालकपदी रो. भागवत केंद्रे, बुलेटिन संपादक म्हणून रो. पवन मुत्तेपवार, लसीकरण प्रमुख म्हणून रो. अन्नपूर्णा गुत्तेदार व रो. सुनीता लोहारे, तर सार्जंट अॅट आर्मपदी रो. गजानन चिद्रेवार आदींची निवड झाली आहे. 

नूतन पदाधिकार्यांंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Popular posts
*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏
Image
सरदार वल्लभभाई पटेल शाळेत लॉयनेस क्लब गोल्डच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
Image
कृषी विधेयक स्थगिती अध्यादेशाची उदगीरात भाजपाकडून होळी
Image
*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी*
Image
स्त्रियांचा सन्मान करणारेच खरे शिवरायांचे अनुयायी : दिशा पिंकी शेख उदगीर : छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी म्हणवून घेणा-यांची संख्या कमी नाही परंतु स्त्रियांचा सन्मान करणारेच ख-या अर्थाने शिवरायांचे अनुयायी असू शकतात असे मत सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले. उदगीर येथील सार्वजनीक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने नगर परिषदेसमोरील प्रांगणात दिशा पिंकी शेख यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील अठरा पगड जातींना सोबत घेवून स्वराज्याचे स्वप्न पाहीले व ते पूर्ण केले. आज समाजात जाती जातीत, धर्माधर्मात भेद करणारी मंडळी वाढत आहे. जाती धर्माच्या पलीकउे जावून देशाच विचार करणाराच खरा देशभक्त असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभार चालविताना आपल्या आईचा सन्मान करून समस्त स्त्री जातीचा सन्मान केला असल्याचे सांगितले. आज मात्र आपली आई, बहीण, मुलगी, पुरूषी वर्चस्वाखाली दबून छळली जात आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होण्याऐवजी वरचेवरवाढत चालले आहे. महिलंाना अजूनही वैचारिक स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही अशी खंत व्यक्त करीत जोपर्यंत स्त्रीयांची वैचारिक गुलामगिरी संपणार नाही तोपर्यंत हा शिवरायाचा महाराष्ट्र होणार नाही असे शेख यावेळी म्हणाल्या. सार्वजनीक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दोन दिवस कलामहोत्सव पार पडले. या कलामहोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वियज निटूरे व मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नरेंद्र कठारे, नीता मोरे, काजोल मिरजगावे, संगीता नेत्रगावे, स्वप्नील पकोळे, सुनील कोळी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीता मोरे यांनी केले. पाहूण्यांचा परिचय अनिता यलमटे यांनी करून दिला.
Image