अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशनासाठी आवाहन
उदगीर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आयोजित 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
यात पुस्तक प्रकाशन करण्यासाठी नोंदणी अर्ज मागविण्यात येत आहेत. पुस्तकाच्या अवेष्टित पाच प्रती लेखकांच्या सहीसह संमेलनाला येते वेळेस घेऊन यावे. ज्या लेखक, कवींना पुस्तक प्रकाशित करावयाचे आहे, त्यांना नाममात्र शंभर रुपये शुल्क आकारण्यात येईल. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2022 आहे. अधिक माहितीसाठी पुस्तक प्रकाशन समितीचे समन्वयक प्रा. एस. एम. सूर्यवंशी (मो. नं. 9421694785 / 8788180344) वेबसाईट : abmss95.mumu.edu.in यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष तथा अध्यक्ष, मसाप उदगीर रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा