कथाकथानाचा उपक्रम संमेलनाला ग्रामस्तरावर पोचवेल-रामचंद्र तिरूके

कथाकथानाचा उपक्रम संमेलनाला ग्रामस्तरावर पोचवेल-रामचंद्र तिरूके

उदगीर : साहित्याचा प्रवाह ग्रामीण भागापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने "९५ वे संमेलन:९५ कथाकथन "या उपक्रमातून संमेलन गावपातळीवर पोहचेल असा विश्वास संस्थेचे उपाध्यक्ष तथा मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य रामचंद्र तिरुके यांनी व्यक्त केला.वाढवणा बु.येथील जि.प.शाळेत या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.कथाकार दिगंबर कदम ,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर , मसापच्या उदगीर शाखेचे उपाध्यक्ष विवेक होळसंबरे,प्रा.डॉ .स्मिता नागोरी-लखोटिया, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्यंकट मुंडकर, केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे , जाकीर तांबोळी, मु.अ.मजहर शेख, प्रा.रामदास केदार, रसूल पठाण, प्रभावती वडजे, निता मोरे,रेश्मा शेख,अनिता हैबतपूरे उपस्थित होते.
केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे यांनी प्रास्तविक केले.या उपक्रमाचे समन्वयक धनंजय गुडसूरकर यांनी उपक्रमाविषयी विवेचन केले. "साहित्यसंमेलन ही या परिसराला मिळालेली मोठी संधी आहे,या माध्यमातून या परिसरातील साहित्य जाणिवा विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचे तिरुके म्हणाले . यावेळी कथाकार दिगंबर कदम यांनी आपली 'पांगुळ 'ही कथा सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. व्ही.पी.गुरमे यांनी प्रास्तविक तर प्रा.रामदास केदार यांनी आभार मानले.

सहभागाचे आवाहन..
अ.भा.मराठी साहित्यसंमेलन ही आपल्या दारी आलेली अक्षरगंगा आहे.याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.जि.प.प्रा.शाळा किनी(य.),एकुर्का रोड,समर्थ विद्यालय एकुर्कारोड या शाळांतील विद्यार्थी ,शिक्षकांनी या उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला.