मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी राष्ट्रपतीना १०हजार मराठी स्वाक्षरीचे निवेदन मातृभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम, मराठी दिनानिमित्त मोहिमेस सुरुवात

 मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी राष्ट्रपतीना १०हजार मराठी स्वाक्षरीचे निवेदन


मातृभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम, मराठी दिनानिमित्त मोहिमेस सुरुवात



उदगीर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मातृभूमी प्रतिष्ठान व मातृभूमी महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रपतीना १० हजार स्वाक्षरीचे निवेदन मोहिमेचा शुभारंभ मसापचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या हस्ते करण्यात आला.
मराठी भाषा दिना निमित्य ता.२७ रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कुमाग्राज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक धनंजय गुडसुरकर , रामदास केदार , अंबादास केदार , निता मोरे , विवेक होळसंब्रे , सुरेखा गुजलवार ,रसूल पठाण , आदी साहित्यिक उपस्थित होते .
उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाली याची घोषणा व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करून राज्य शासन आणि केंद्र शासनाचा पाठपुरावा करणार असल्याचे श्री तिरुके यांनी यावेळी सांगितले .
मराठी मराठी भाषेचा इतिहास अति प्राचीन स्वरूपाचा आहे.अस्सल साहित्यिक परंपरा असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी मराठी राजभाषादिना निमित्त दहा हजार स्वाक्षरीचे निवेदन महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोंविंद यांना उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्या मार्फत पाठवले जाणार असल्याचे मातृभूमीचे अध्यक्ष सतिश उस्तुरे सांगितले .
यावेळी प्राचार्या उषा कुलकर्णी , संजय राठोड , प्रा. गौरव जेवळीकर , प्राचार्य व्हीं एस कणसे , प्रा संजय मुडपे अॅड महेश मळगे,सुधीर पाटील लक्ष्मण बेंबडे ,प्रा बिभीषण मद्देवाड , प्रा. रणजित मोरे , प्रा सय्यद उस्ताद , नंकिशोर बयास , दयानंद टाके ,देवा डोंगरे , रोहिणी ,म्हेत्रे कोमल , कांबळे करुणा , श्रृंगारे ललिता , कांबळे पल्लवी , कोटांबे अनुराधा , ओंकारे जगदीशा यांच्यासह नागरिक उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रा .अश्विनी देशमुख यांनी सुञसंचलन तर प्रा रेखा रणक्षेञे यांनी आभार मानले . 
Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही