बालिकांचा सन्मान हा भक्तीचाच मार्ग -जि.प,अध्यक्ष राहुल केंद्रे

 बालिकांचा सन्मान हा भक्तीचाच मार्ग -जि.प,अध्यक्ष राहुल केंद्रे उदगीर (वार्ताहर )

    "बालिका या समाजिक भूषण असून त्यांचा सन्मान करणे हा भक्तीचाच मार्ग आहे,स्रीजातीचा सन्मान ही आपली संस्कृती आहे,हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून ती दृढ करु या " असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले होनीहिप्परगा येथे अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते."हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून समाज एकत्र येतो,सामाजिक जाणिवा विकसित होतात.धार्मिक संस्कारातून मूल्यांची पेरणी होते.नव्या पिढीला ही परंपरा माहीतही होते.याबरोबरच सामाजिक दृष्टीने विचारमंथनही होणे गरजेचे आहे."स्रियांना आदर देण्याची आपली संस्कृती असून हा वारसा पुढे चालवून आपल्याला वृद्धिंगत करावयाचा आहे.आजची बालिका ही उद्याची स्री असून ती समाजाचे नेतृत्व व काळजी घेणारी आहे,यामुळे तिचा सन्मान करणे गरजेचे आहे"असे मत जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पुढे बोलताना व्यक्त केले."स्रियांनी सर्वच क्षेत्रं पादाक्रांत केली असून त्यासाठी आपला सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले.होनिप्परगा येथे आयोजित हरिनाम सप्ताह निमित्ताने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या वेळी सरपंच खंडू गायकवाड पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे नारायणराव नरवडे संजय मामा पाटील नानासाहेब माने चंदरराव पाटील शेषराओ पाटील शरद मुळे भीमराव जाधव राजू केंद्रे राम नागरगोजे सचिन नागरगोजे अनिल मारवाड़ी उपस्थित होते.