उदगीर : शिवाजी चौकात पोलीस चौकीचे उद्घाटन रोटरी क्लब, डॉक्टर असोसिएशन व धन्वंतरी महाविद्यालयाचा पुढाकार
उदगीर: शिवाजी चौकात पोलीस चौकीचे उद्घाटन

रोटरी क्लब, डॉक्टर असोसिएशन व धन्वंतरी महाविद्यालयाचा पुढाकार
उदगीर : उदगीर येथील शिवाजी चौकात रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल, डॉक्टर असोसिएशन व धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या पुढाकाराने पोलीस चौकी उभारण्यात आली असून या चौकीचे उद्घाटन नांदेड विभागाचे पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी जॉन डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक गोरख दिवे, दिपककुमार वाघमारे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद शेटकार, सचिव रवींद्र हसरगुंडे, किशोर पंदिलवार, रामेश्वर निटूरे, महानंदा सोनटक्के, अन्नपूर्णा मुस्तादर, ज्योती डोळे, सरस्वती चौधरी, अरुणा लेंडाणे, विजय पारसेवार, रामदास जळकोटे, विशाल जैन, गजानन चिद्रेवार, संतोष फुलारी, गोपाळ पाटील वागदरीकर, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, डॉक्टर असोसिएशनचे डॉ. गोविंद सोनकांबळे, डॉ. श्रीकांत मधवरे, डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. धनाजी कुमठेकर, डॉ. चंद्रकांत कोठारे, डॉ. एस. आर. श्रीगिरे, डॉ. सुनील बनशेळकीकर, यांच्यासह रोटरी क्लब, डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी व धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.