मुठभर धान्य व एक रुपया मोहिमेला प्रारंभ : 16 वे विद्रोही साहित्य संमेलन

 मुठभर धान्य व एक रुपया मोहिमेला प्रारंभ : 16 वे विद्रोही साहित्य संमेलन


उदगीर : उदगीर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर येत्या २३ व २४ एप्रिल रोजी १६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या आर्थिक नियोजनासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने उदगिरात विद्रोहाचा जागर करत मदतफेरी काढण्यात आली आहे. मूठभर धान्य आणि एक रुपया विद्रोही साहित्य संमेलनासाठी द्यावे असे आवाहन करीत १६ व्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी जागर मोहीम सुरू करण्यात आली आहे.
उदगीर शहरात १६ वे विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने मूठभर धान्य आणि एक रुपया विद्रोही साहित्य संमेलनासाठी मदतफेरी मोहीम सुरू करून धान्य व निधी संकलित करण्यात येत आहे.
विद्रोही साहित्य संमेलनासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने शनिवारी उदगीर शहरातील सर्व महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करून शहरातून निधी संकलनासाठी मदतफेरीचा शुभारंभ करण्यात आला. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने उदगीर शहरात काढण्यात आलेल्या मदतफेरी मध्ये बहुजनांचे साहित्य... विद्रोही साहित्य, कष्टकऱ्यांचे साहित्य..... विद्रोही साहित्य, कामगारांचे साहित्य... विद्रोही साहित्य अशा घोषणा देऊन विद्रोही साहित्य संमेलनाचा जयजयकार करण्यात आला. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी उदगिरात आयोजित विद्रोही साहित्य संमेलनासाठी मूठभर धान्य आणि एक रुपया द्यावे, असे आवाहन केले.
विद्रोही साहित्य संमेलन अत्यंत कमी खर्चात होत असतात. परंतु आज पर्यंत झालेली विद्रोही साहित्य संमेलने सर्वोच्च वैचारिक दर्जा देणारी राहिलेली आहेत असे सांगितले. शनिवारी विद्रोही साहित्य संमेलनासाठी मदत फेरीतून अकरा हजार ४९ रुपयांचा निधी संकलित झाला असल्याचे अहमद सरवर यांनी सांगितले. 
यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले, विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डॉ. अंजुम कादरी, मुख्य संयोजक निवृत्ती सांगवे, मुख्य निमंत्रक प्रा. मारोती कसाब, दत्ता खंकरे, संदीप पाटील, अहमद सरवर, डॉ. सतिश नाईकवाडे, प्रा. अंकुश सिंदगीकर, बाबुराव मशाळकर, राजकुमार माने, बाबासाहेब सूर्यवंशी, श्रीनिवास एकुर्केकर, सुधीर कांबळे, विद्यासागर डोरनाळीकर, यासीन शेख, संजय काळे, गणेश मुंडकर, , सुबोधकुमार एकुर्केकर आदी उपस्थित होते.
Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर: ईश्वर समगे यांचा पुढाकार
Image
उदगीर येथील 51 व्यक्तींचे स्वॅब नमुने निगेटिव्ह
ऍड. दत्ताजी पाटील यांचा पुढाकार: आ. निलंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य : पालिका कर्मचाऱ्यांना रोगप्रतिकारक शक्ती गोळ्यांचे वाटप: पालिकेकडे एक हजार बांबूची रोपे सुपूर्द
Image
जमहूर उर्दू शाळेत राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते वृक्षारोपण  
Image