*उदयगिरी अकॅडमी उदगीरच्या शिरपेचात मानाचा तुरा*
-------------------------------------------
शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या उदगीर सारख्या ठिकाणी अनेकांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत उदगीरचे नाव पार दूरवर पोहोचवले. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात प्रामाणिकपणे मेहनत करून विद्यार्थी घडवण्याचा वसा हाती घेऊन २०११ मध्ये गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रा.गोपाळकृष्ण घोडके यांनी उदयगिरी अकॅडमी ची सुरुवात करून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून उदगीरचे नाव दूरवर पोहोचवले. नांदेड , लातूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील लोक उदगीर म्हटलं की उदयगिरी अकॅडमीचं नाव घेतात.सर्वदूर नावानं ओळखलं जाणारं उदगीर मधील हे एकमेव शैक्षणिक युनिट आहे.
प्रा.गोपाळकृष्ण घोडके सरांचा जन्म गुंडोपंत दापका ता.मुखेड जि.नांदेड येथे दि. २ डिसेंबर१९७४ रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. गणित आणि भौतिकशास्त्र विषयात एम.एस्सी.बी.एड.झालेले प्रा.गोपाळकृष्ण घोडके सरांनी विश्वासू असे सहकारी सोबत घेत २०११ मध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर " उदयगिरी अकॅडमी " ची सुरुवात केली. समाजकारण, राजकारण यात ही त्यांची खूप पोहोच आहे. आपल्या वक्तृत्वाने संबंध महाराष्ट्र गाजवून सोडणारे प्रा.घोडके सर हे राजकारणातही सक्रिय असतात.राजकारणातले अनेक पद भूषवित त्यांनी जनतेची सेवा केली.संचलन मग ते छोट्या कार्यक्रमाचे असो वा हजारोच्या सभेचे ते बिनधास्त अलंकारिक व यमकयुक्त वाणीने ते श्रोत्यांचे मन जिंकतात.महाविद्यालयीन जीवनात त्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील १०० पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त केले.प्रा.घोडके सर राजकारण ,समाजकारण करीत शैक्षणिक क्षेत्रात २०११ ला " उदयगिरी अकॅडमी "च्या माध्यमातून स्थीर झाले.
या अकॅडमीत शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी., स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी घडविले जातात. शिष्यवृत्ती, नवोदय, एम.टी. एस. ,एन.टी. एस. , एन.एम.एम.एस. , अशा स्पर्धा परीक्षेत शेकडो विद्यार्थी यशस्वी झाले. इयत्ता दहावीच्या परीक्षेत या अकॅडमीचे विद्यार्थी गणित, इंग्रजी, विज्ञान विषयांत पैकीच्या पैकी गुण घेतात. मार्च 2020 व मार्च 2021 च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उदयगिरी अकॅडमी चा वरद मारमवार, वैभव शेरे, प्रथमेश पाटील, मीरा बेनजर्गे , अश्विन उजडे, हरीओम देवकते , ढगे अंकिता, प्रणव लगड , विद्याधरी बंडरे , कांबळे प्रतीक्षा , कुलकर्णी श्रुती, जाधव धीरज , केंद्रे श्रेया, ओम शेरीकर, साक्षी बिरादार, ओमकार सोनटक्के अशा एकूण सोळा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. 2022 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री , लातूर जिल्ह्याचे पालक मंत्री ना. अमित देशमुख साहेब , व राज्याचे कार्यसम्राट पर्यावरण मंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री नामदार संजय बनसोडे साहेब यांच्या शुभहस्ते पार पडले. शिक्षणाबरोबरच या अकॅडमीत संस्काराचे धडेही दिली जातात.आपल्या सणवाराची माहिती दिली जाते.तसेच आई-वडील, गुरुजन ,वडीलधारील माणसांशी कसे वागावे, कसा आदर करावा याचे मार्गदर्शन केले जाते. महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी साजरी करून त्यांचे विचार ऐकवले जातात.प्रा.घोडके सरांनी हजारो विद्यार्थी घडविले जे प्रशासनात मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थी डॉक्टर,इंजिनियर झाले.
प्रा.गोपाळकृष्ण घोडके, हे प्रा.संतोष पाटील प्राध्यापक डॉक्टर धनंजय पाटील , प्रा सौ ज्योती खिंडे, प्रा. सौ मीना हुरदले प्राध्यापक श्रीगण रेड्डी व सहकारी प्राध्यापकांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी या अकॅडमीत घडविले.विद्यार्थ्यांच्या यशातच आपले समाधान असल्याचे प्रा.घोडके सर बोलून दाखवतात.१२ वर्षांपूर्वी लावलेले उदयगिरी अकादमी चे इवलेशे रोपटे आज वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे.उदयगिरी अकॅडमी च्या संचालक व पूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवूया !
*शंकर बोईनवाड*
*पत्रकार ,उदगीर*