साहित्य संमेलनासाठी सायकल प्रचार फेरी नळगीर मध्ये

 


साहित्य संमेलनासाठी सायकल प्रचार फेरी नळगीर मध्ये

नळगीर :- महाराष्ट्र उदयगीरी महाविद्यालयाच्या प्रांगणात 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सं मेलन होत असून याच्या प्रचार व प्रसारासाठी सायकलिंग करणा॒ऱ्या उदगीर सायकलिंग क्लबच्या पुढाकाराने दररोज ग्रामिण भागात जाऊन संमेलन प्रचार करण्यात येत आहे नळगीरचे प्रसिद्ध वकिल पद्माकर उगीले यांच्या पुढाकाराने गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये उदगीरहून  सुनील ममदापूरे, अनिरुद्ध जोशी,अतुल वाघमारे, विवेक होळसंबरे, कपिलदेव कल्पे, डॉ मनोज कामशेट्टे, अमोल पाटील, सुशीलकुमार पांचाळ, अभिजित नळगीरकर,सतिशकुमार चवळे, गोविंद रंगवाळ, मुकेश निरुणे, बालाजी पांडे, दत्तात्रय आडके यांनी सहभाग घेतला व यात गावातील तरणानीही उत्साहाने सहभाग नोंदविला चौकाचौकात कोपरा सभा घेऊन संमेलनाला येण्याचे आवाहन करण्यात आले शेवटी संतोष सोनवणे यांनी नळगीर ग्रामपंचायतने पंचवीस हजार निधी देणार असल्याचे सांगितले व गावातील नागरिक व तरुण मोठ्या संख्येने घेऊन येण्याचे सरपंचांच्या वतीने आश्र्वासन दिले व शेवटी सिद्धांत उगीले यांनी आभार मानले.