मांजरा पट्टयाप्रमाणेच तेरणा पट्टयाचाही विकास साधणार : पालकमंत्री अमित देशमुख

मांजरा पट्टयाप्रमाणेच तेरणा पट्टयाचाही विकास साधणार : पालकमंत्री अमित देशमुख

गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते अंबुलगा कारखान्यात मशिनरी पुजन.

दसरा दिवाळी दरम्यान कारखान्यात प्रत्यक्ष गळीत हंगामाला सुरवात.

वीज, इथेनॉल, बायोगॅस, इंधननिर्मीतीचेही प्रकल्प उभारणारनिलंगा: निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथे सध्या बंद असलेला डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना आता ट्वेन्टीवन शुगर लि. चालवणार असून आज गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर कारखाना मेन्टेनन्सचा कामाचा शुभारंभ करुन निलंगा तालुक्यात विकासाची गुढी उभारली आहे, असे नमुद करुन यापुढे मांजरा पट्टयाप्रमाणेच तेरणा पट्टयाचाही विकास साधला जाईल, अशी ग्वाही लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.महाराष्ट्र राज्‌य शिख्र बँकेने अंबुलगा येथील डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना ट्वेन्टीवन शुगरला दिर्घ मुदतीने भाडेतत्वावर दिला असून आज पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते याठिकाणी मशिनरीचे पुजन करुन मेन्टेनन्सच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात केली, याप्रसंगी ते बोलत होते.


यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख म्हणाले की, बंद कारखाना चालू करण्याचा संकल्प करून आज निलंगा तालुक्यात विकासाची गुढी उभारली आहे. या माध्यमातून मांजरा पटटया प्रमाणेच तेरणा पटटयाचाही सर्वांगीण विकास साधला जाईल. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांनी दूरदृष्टी ठेवून उभारलेली साखर कारखानदारी आदरणिय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळातही अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवून त्यांचे स्वप्न साकार केले जाईल. आज मशीनरी दुरूस्तीचा प्रारंभ केला असून येत्या दसरा दिवाळीला या कारखान्याच्या प्रत्यक्ष गळीत हंगामाला सुरूवात केली जाईल. हा कारखाना फक्त साखर उत्पादनाच्या मर्यादेत न ठेवता या ठिकाणी विज, इथेनॉल, बायोगॅस, इंधननिर्मीतीचेही प्रकल्प उभारले जातील. डॉ.शिवाजराव पाटील निलंगेकर साहेब यांनी लावलेले हे रोपटे वटवृक्षात रूपांतरीत केले जाईल. त्यांच्या नावाला शोभेल असेच काम या कारखान्याच्या माध्यमातून होईल, अशी ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी बोलतांना दिली.
प्रारंभीच्या वक्त्यांनी बोलताना, मागच्या सरकारच्या काळात हा कारखाना चालु होऊ शकला नाही त्याबद्दल खंत व्यक्त केली होती. तो संदर्भ घेऊन बोलताना ना.अमित देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारा ऊसच लाऊ नये असे ज्यांचे मत आहे त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करणेच चुकीचे आहे. महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारे निर्णय हे सरकार घेत आहे. आदरणिय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात वाढलेल्या मांजरा परिवाराकडे अंबुलगा येथील हा साखर कारखाना आल्याचा शेतकऱ्यांना आनंद आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगीतले. 


संपुर्ण जिल्ह्याचा समतोल विकास साधायला हवा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित देशमुख यांनी हा कारखाना चालवायला घेतला आहे. ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. हा कारखाना योग्य पद्धतीने चालावा म्हणून जिल्हा बँक सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही लातूर ग्रामीणचे आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांनी यावेळी दिली. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण ठेऊन विकास कामात सर्वांनीच सकारात्मक विचाराने एकमेकांना सहकार्य केले पाहीजे हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत, असे सांगुन विकास प्रक्रियेत आडवे येणाऱ्यांना वेळीच सरळ करणे तेवढेच गरजेचे असते असे त्यांनी ठासुन सांगीतले.

या कार्यक्रमात प्रारंभी बोलताना प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना उभारणी संदर्भातील तपशिल विषद केला. नैसर्गिक कारणामुळे कारखाना अडचणीत आला असता युती सरकारने त्यास सहकार्य केले नाही किंवा तो चालु करण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे दीर्घ काळापर्यंत हा कारखाना बंद राहिला आहे. मांजरा परिवारामार्फत हा कारखाना आता सुरु होत असल्याचा आपणास आनंद असून शेतकऱ्यांच्या हितासाठी याकामी सर्वोतोपरी सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंके यांचेही उत्स्फुर्त भाष्ण झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना बोलुन दाखवल्या. मांजरा परिवाराने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन अंबुलगा कारखाना चालवण्यास पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी निलंगा तालुक्यातील जनतेच्या वतीने ना.अमित विलासराव देशमुख यांचे आभार मानले.


कार्यक्रमाच्या शेवटी माजी सभापती अजित माने यांनी आभार मानले. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, सचिव अभय साळुंखे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, उमेश जोशी, रेणा साखचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अँड किरण जाधव, लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा सूर्यशिला मोरे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, माजी सभापती अजित माने, लक्ष्मणराव मोरे, दिलीप माने, विजयकुमार पाटील, राजकुमार जाधव, अँड नारायण सोमवंशी, हमीद शेख, सुधाकर पाटील, दत्तात्रय देशमुख, अजय देशमुख, कार्यकारी संचालक समीर सलगर आदींसह काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts
संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 14 जूनला उदगीरात आयटीआय प्रवेश मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
श्रमदानाने महिलांनी केला जागतिक महिला दिन साजरा : ग्रीन आर्मीचा पुढाकार उदगीर : वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करीत पर्यावरणाची जपणूक करण्याच्या कामात सतत अग्रेसर असलेल्या ग्रीन आर्मी या संघटनेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी श्रमदान करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. देगलूर रोडवरील पाटबंधारे कार्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन आर्मीच्या वतीने गत जून महिन्यात या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती. यातील बरीच झाडे जगली असून त्यांच्या संवर्धनासाठी आज महिलांनी श्रमदान करीत झाडांना पाणी घातले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानीही या श्रमदांनात सहभाग नोंदविला. या ऑक्सिजन पार्कसाठी रश्मी सूर्यवंशी यांनी दहा झाडे भेट देवून ती जगविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने, अर्चना नळगीरकर,अनिता यलमटे, शोभाताई कोटलवार, सरिता खोडे, रश्मी सूर्यवंशी, साधना रायवाड, वर्षा कोटलवार आदींनी पुढाकार घेतला. डॉ. अनिल भिकाने, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, गोपालकृष्ण नळगीरकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, पत्रकार विक्रम हलकीकर, ऍड. निशांत धवलशंख यांच्यासह पाटबंधारे विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Image
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image