उदगीरसाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालयास राज्य शासनाची मंजुरी* *उदगीरकरांची महाराष्ट्रात एम.एच. - ५५ ही नवी ओळख* *क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची माहिती*

 *उदगीरसाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालयास राज्य शासनाची मंजुरी*



*उदगीरकरांची महाराष्ट्रात एम.एच. - ५५ ही नवी ओळख*


*क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची माहिती*


*उदगीर* : तीन राज्याच्या सीमेवर असणा-या उदगीर या ऐतिहासिक शहरात आता आणखी एका कार्यालयाची भर पडली आहे.

जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या उदगीर येथील लोकसंख्येचा विचार करून स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्याबाबतचा अध्यादेशही तातडीने काढण्यात आला असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.


राज्य शासनाने दि.१५ मार्च रोजी घेतलेल्या निर्णयानुसार उदगीर येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे (एम.एच. - ५५) या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार

नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उदगीर कार्यालयासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यात येणार आहेत. तूर्तास कार्यालयासाठी विहीत मानांकनानुसार आवश्यक पदे इतर कार्यालयातून समायोजित करण्याची कार्यवाही राज्य परिवहन आयुक्तांनी करावी, शिवाय, एक इंटरसेप्टर वाहनास मंजुरी देण्यात आली आहे. कार्यालय सुरू करण्यासाठी शासकीय, खासगी मालकीची जागा भाडेतत्वावर, घेण्याची कार्यवाही करावी असेही अध्यादेशात म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्वतंत्र आरटीओ कार्यालयाचा प्रस्ताव प्रलंबित होता. त्याला मंजुरी मिळाली आहे, असेही क्रीडा मंत्री बनसोडे म्हणाले.

या कार्यालयामुळे उदगीरकरांचा लातूरला जाण्याचा वेळ वाचणार असुन उदगीर शहरातील दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या व त्यानुसार वाहनांची संख्या लक्षात घेवुन मतदार संघातील वाहनधारकांची गैरसोय लक्षात घेवुन क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ( आर. टी.ओ. कार्यालय) स्थापन करण्याची मागणी करुन ती राज्य शासनाकडुन मंजूर करुन घेतला असल्याचे सांगितले.

अशक्य ते शक्य करण्याची किमया क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचेकडे असल्याने मतदार संघाच्या विकासाचा प्रभाव संपुर्ण महाराष्ट्रासह व बाजूच्या राज्यात असल्याने ना.संजय बनसोडे यांचे कौतुक होत आहे.


सदर कार्यालयामुळे महाराष्ट्रात आता उदगीर शहराची नव्या क्रमांकासह ओळख निर्माण होणार असल्याने वाहनधारक व नागरिकांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.

Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
सुधाकर श्रृंगारेच्या विजयासाठी भाजपा युवा मोर्चा सज्ज: जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे.
Image
*जागतिक वन दिनी जिल्हाधिकारी रमल्या फुलांच्या-पक्षांच्या सान्निध्यात !*
Image
उदगीरात महिला बचत गटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर संपन्न नगर परिषदेच्या उपक्रम: जागतिक महिला दिनाचे औचित्य
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image