उदगीर शहरात ८ ते १२ मार्च दरम्यान 'महादंगल' : ना.संजय बनसोडे यांची माहिती

 उदगीर शहरात ८ ते १२ मार्च दरम्यान 'महादंगल' : ना.संजय बनसोडे यांची माहिती

*स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे ऐतिहासिक उदगीर शहरात आयोजन*



*उदगीर* : महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीची जोपासना व वाढ होण्यासाठी विविध खेळांच्या माध्यमातून युवा पिढीला खेळाकडे आकर्षित करुन त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव देण्याच्या हेतूने आपण विविध क्रीडा स्पर्धा घेत आहोत.

महाराष्ट्रात कुस्तीसारख्या देशी खेळाबाबत ग्रामीण व शहरी भागात विशेष आवड व आत्मियता आहे. कुस्ती हा खेळ महाराष्ट्रात सर्वत्र खेळला जातो. देशातील इतर राज्यात व देशाबाहेरही कुस्ती खेळाचा प्रचार व प्रसार करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. 

राज्याची कुस्ती खेळातील कामगिरी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय आहे. 

या स्पर्धेमध्ये राज्यातील ३६० खेळाडू व संघ व्यवस्थापक सहभागी होणार आहेत. यामध्ये फ्रीस्टाईल १० संघ, ग्रीको रोमन १० संघ व मुलीचे १० संघ असे एकूण ३० संघ सहभागी होणार असून, प्रत्येक संघात दहा वजनगटातील १० खेळाडू तसेच प्रत्येक संघासोबत एक संघ व्यवस्थापक व एक मार्गदर्शक असा १२ जणांचा संघ सहभागी असणार आहेत.

राज्यातील खेळाडूंना क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होण्याची संधी मिळवून देण्यासाठी, ऑलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी, त्यांच्या नावाने स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला असुन आपल्या उदगीर शहरात येत्या ८ ते १२ मार्च दरम्यान 'महादंगल' कुस्ती स्पर्धेचे आयोजन आपण केले असल्याची माहीती

राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.


ते उदगीर शहरातील नवीन शासकीय विश्रामगृह येथे आयोजीत पत्रकार परिषदेत

ऑलिंपिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धाबाबत माहिती देताना बोलत होते.


या पत्रकार परिषदेस उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, 

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पै. अस्लम काझी, पो.नि. करण सोनकवडे, पो.नि. अरविंद पवार, तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत लोदगेकर, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.बनसोडे यांनी, या कुस्ती स्पर्धा मॅटवर होणार असुन दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता या कुस्ती स्पर्धेचे मोठ्या थाटात उद्धाटन होणार आहे. मागील काळात विविध स्पर्धांचे आयोजन करुन खेळाडुंच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभा असल्याची ग्वाही देवुन गेल्या ७ महिन्यात खेळाडुंचे हिताचे अनेक निर्णय घेतले असुन येत्या काळात मिशन लक्षवेध योजना राबवणार आहे. गेल्या ३ वर्षापासुन रखडलेल्या शिवछत्रपती पुरस्काराचे वितरण आपण मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे केले तर 

आशियाई क्रीडा व गोवा येथील स्पर्धेत आपल्या खेळाडुंनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. पुणे शहरात तब्बल ७५ कोटीचे ऑलम्पिक भवन उभारण्याचे काम चालु आहे तर पुणे शहरात अंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तर संभाजीनगर येथे क्रीडापीठ आपण करत आहोत. यामुळे आता आपल्या भागात आंतरराष्ट्रीय खेळाडु घडण्यास मदत होईल असेही ना.बनसोडे यांनी सांगितले.

Popular posts
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
सुधाकर श्रृंगारेच्या विजयासाठी भाजपा युवा मोर्चा सज्ज: जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे.
Image
उदगीरात महिला बचत गटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर संपन्न नगर परिषदेच्या उपक्रम: जागतिक महिला दिनाचे औचित्य
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image