उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..

उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... 

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..

 


उदगीर : आगामी विधानसभा निवडणुकीत उदगीर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला सोडवून घ्यावा अशी मागणी उदगीर दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे उदगीर मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

उदगीर जळकोट विधानसभा मतदार संघात गेल्या पंचवीस वर्षांपासून काँग्रेस पक्षाचा  आमदार  झालेला नाही. यावेळी  उदगीर जळकोट मतदार संघात सर्व स्थानिक स्वराज स्वंस्था  वर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. व  पक्षांचे संघटन मजबूत  आहे.  आणि  जिल्हा बँक, साखर कारखाने, मार्केट कमिटी नगरपरिषद व नगरपंचायत, आणि पंचायत समिती आणि जि. प. सर्कल  काँग्रेस च्या ताब्यात राहिलेल्या आहेत. व सर्व पदाधिकारी यांची बैठक होऊन त्यामध्ये यावेळी  महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षाचा उमेदवार दयावा म्हणून आग्रही मागणी पुढे आली आहे. तरी  मतदार संघातील बदलेली परिस्थिती व  काँग्रेस पक्ष विषयी जण माणसात असलेली भावना विचारात घेऊन  उदगीर जळकोट विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडवून घ्यावी अशी विनंती संयुक्त निवेदनाद्वारे काँग्रेसचे नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना करण्यात आली. 

या निवेदनावर उदगीर काँग्रेस चे अध्यक्ष कल्याण पाटील, जळकोट काँग्रेस चे अध्यक्ष मारोती पांडे, उदगीर शहर अध्यक्ष मंजूर पठाण, युवक काँग्रेस अध्यक्ष धनराज पाटील, प्रदेशसचिव उषाताई कांबळे, उपसभापती प्रीती भोसले, सभापती शिवाजी हुडे, माजी नगरसेवक श्रीरंग कांबळे, राजकुमार भालेराव, महेबूब शेख, विलास शिंदे, शमशोद्दिन जरगर, शिवराज पाटील, संदीप पाटील तोंडारकर, प्रा. गोविंद भालेराव, बबन धनबा, अमोल घुमाडे, शेषेराव भाकसखेडे, डॉ. हनमेगौडा मेहतर, पंडित ढगे, विनोबा पाटील, संतोष वळसने, अमित लांजे, मंगेश हुंडेकर अनु.जा.अध्यक्ष संग्राम कांबळे, संभाजी कोसमबे,  अल्पसंख्याक अध्यक्ष नूर पठाण,  उपाध्यक्ष सुधाकर सोनकांबळे, सहकार विभाग अध्यक्ष ज्ञानोबा मालुसरे शिवाजी पाटील, नाना धुपे, विवेक जाधव, दत्ता सुरनर, संजय पवार आदींसह पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज