उदगीर येथे भाजप खासदारांच्या विरोधात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन
उदगीर : लोकसभेच्या सभागृहात जातनिहाय जनगणनेची मागणी करणारे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांची जात विचारणाऱ्या भाजप खासदार अनुराग ठाकुर यांच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर (जि. लातूर) येथे खासदार ठाकूर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला.
याप्रसंगी लातूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री प्रविणकुमार बिरादार, प्रदेश सचिव श्रीनिवास एकूर्केकर, जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर अडगुलवाड, विधानसभा अध्यक्ष अमोल कांडगीरे, उपाध्यक्ष विपीन जाधव, शहराध्यक्ष धिरज कसबे, फैयाज डांगे,सद्दाम बागवान,आदर्श पिंपरे, प्रितम गोखले, कनिष्क शिंदे, एकनाथ कांबळे, आकाश माने,अक्षय सोनकांबळे, आकाश लोणीकर,अमोल पागे, प्रवीण मस्के, पवन मसुरे,अर्जुन वाघमारे,अच्युत गोदे, बालाजी सूर्यवंशी,सुधाकर सूर्यवंशी, रच्युत सुवर्णकार, धीरज गवारे,विलास आडे,महेश कांबळे, पंकज चांदोरकर,प्रभाकर गायकवाड ,प्रमोद सोनकांबळे,विकास राठोड, अंकुश राठोड, भगवान राठोड, चंद्रकांत जाधव, रमेश राठोड,सुरज राठोड, सचिन राठोड, रोहिदास राठोड यांच्यासह युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.