निलंगा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

निलंगा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी



निलंगा : निलंगा शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती मोठ्या थाटामाटात भव्य दिव्य साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने शहरातील विविध ठिकाणी ध्वजारोहण व प्रतिमा पूजन करण्यात आले.  शिवाजीनगर येथील महाडा कॉलनी मध्ये अरविंद  पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व  प्रतिमेचे पूजन करुन अन्नदान करण्यात आले.  वीर लहुजी साळवे नगर येथे अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  अण्णाभाऊ साठे नगर मध्ये पंडितराव धुमाळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आनंदमुनी चौकातील जि.प.केंद्रीय शाळेमध्ये प्रा. डॉ. भगवान वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. तसेच सायंकाळी चार वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये हजारो बांधवांनी सहभाग नोंदविला डीजेच्या तालावर तरुणाई डोलत होती.  भव्यदिव्य मिरवणूक हाडगा नाका ,छत्रपती शिवाजी महाराज चौक ,आनंदमुनी चौक व वीर लहुजी साळवे नगर येथे या मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. जयंती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र कांबळे उपाध्यक्ष बजरंग कांबळे, कोषाध्यक्ष रमेश कांबळे ,श्रीधर कांबळे ,शुभम हरिभाऊ कांबळे, माजी नगरसेवक भगवान अण्णा कांबळे , डाकरे सर  ,बालाजी कांबळे ,नागनाथ घोलप, शिवप्रसाद कांबळे, प्रदीप थोरात विजय कांबळे, पवन कसबे व अनेक पदाधिकाऱ्यांनी जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी जयंती मंडळाच्या वतीने प्रेमनाथ गायकवाड यांनी आभार मानले.

टिप्पण्या
Popular posts
*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने मोफत मास्क वाटप उदगीर(प्रतिनिधी) वेळोवेळी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यातअग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ उदगीर सेट्रलच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून भाजी विक्रेत्यांना व बारा महिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषद मैदानावरील भाजीविक्रेते व शहर पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दत्ता पाटील, रो. विशाल जैन, रो. प्राचार्य व्ही.एस कणसे, रो. प्रशांत मांगुळकर, रो. रवी हासरगुंडे, रो. विजयकुमार पारसेवार इ.रोटरीचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज