राष्ट्रपतींचा दौरा ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला दिशा देणार...!

राष्ट्रपतींचा दौरा ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला दिशा देणार...!



उदगीर ( विक्रम हलकीकर) मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला देशाचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा उदगीर दौरा अखेर यशस्वीरीत्या पार पडला. राष्ट्रपती महोदयांच्या या दौऱ्यात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्रीही उदगीरला येऊन गेले. हा दौरा कसा होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते आणि अखेर दौरा यशस्वी झाला असल्याने हा दौरा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला एक दिशा देणारा ठरला आहे. 

        2014 साली उदगीर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा उभे राहिलेल्या ना. संजय बनसोडे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत झालेला पराभव पचवीत बनसोडे यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच मतदारसंघात संपर्क वाढविला. या काळात जनतेशी ठेवलेल्या संपर्काच्या बळावर संजय बनसोडे 2019 च्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. निवडणुकीच्या नंतर झालेल्या राजकीय घडामोडीत महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित झाली. आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आमदार बनसोडे यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. मिळालेल्या या सत्तेचा ना. बनसोडे यांनी पुरेपूर वापर केला. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्र्यासोबत सलोख्याचे संबंध बाळगून असलेल्या ना. बनसोडे यांनी मंत्रालयातील अधिकारी वर्गाशीही चांगली मैत्री केली. परिणामी उदगीर मतदार संघात विकास निधीचा महापूर येण्यास सुरुवात झाली. येथील सर्व जाती धर्माच्या लोकासाठी सभागृह देत असताना शहरातील मुख्य रस्त्यावर तहसील, पंचायत समिती, प्रशासकीय इमारत, पोलीस स्टेशन, पोलीस वसाहतीची इमारती उभ्या करण्यासाठी राज्य शासनाकडून करोडो रुपयांचा निधी खेचून आणला. आज सर्व इमारती दिमाखाने उभ्या झाल्या असल्याचे दिसत आहेत. 

उदगीर मतदारसंघात विकासाची गंगा चालू असताना मध्यंतरी राज्यात सत्तांतर घडले. व काही काळ राज्यमंत्री असलेले बनसोडे विरोधी पक्षात जाऊन बसले. काही काळातच पुन्हा राजकिय घडामोडी घडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपल्या काही आमदारांना सोबत घेऊन महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. या मंत्रिमंडळात ना. बनसोडे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली. क्रीडा व युवक कल्याण खात्यासह बंदरे विभागासारखी महत्त्वाची खाती त्यांना मिळाली. या काळातही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबतचे मधुर संबंध उदगीरच्या विकासात फायदेशीर ठरले.बंदरे खात्याचे मंत्रिपद मिळाल्याने ना. बनसोडे यांच्या कामाचा आवाका मोठया प्रमाणात वाढला. या खात्याचा मंत्री म्हणून त्यांची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशीही चांगले संबंध प्रस्थापित झाले. या संबंधाचा फायदा ना. बनसोडे करून घेणार नाहीत ते कसे? त्यांनी प्रत्येक परिस्थितीचा योग्य फायदा घेऊन मतदारसंघात विकासाची गंगा चालू ठेवली.  उदगीर जिल्हा निर्मितीची अनेक वर्षांची मागणी आहे. ही मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी ना. बनसोडे यांनी प्रयत्न सुरू केले. आवश्यक असलेल्या शासकीय कार्यालयाच्या इमारती उभ्या करीत असताना आर टी ओ चे स्वतंत्र कार्यालय मंजूर करून घेऊन चालू केले. उदगीर सारख्या शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेऊन ते यशस्वी केले. या संमेलनाच्या माध्यमातून उदगीर शहराचे नाव देशपातळीवर नेऊन पोहोचविण्याचे काम केले. 

उदगीर शहरात गुलबर्गा येथील बुद्ध विहारच्या धर्तीवर उदगीर येथे भव्य दिव्य असे बुद्ध विहार महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ना. संजय बनसोडे यांनी उभे केले. या बुद्ध विहारच्या उद्घाटनासाठी देशाचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण दिले. ते निमंत्रण राष्ट्रपती महोदयांनी स्वीकारले. व मागच्या महिन्यात येण्यासाठी तारीख दिली होती. परंतु काही कारणास्तव तो दौरा स्थगित करण्यात आला होता.  नंतरच्या काळात राष्ट्रपती महोदयांनी 4 सप्टेंबर ही तारीख दिली व त्यानुसार त्यांचा दौरा पार पडला. उदगीर सारख्या एका ग्रामीण भागातील शहरात राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रम पूर्ण ताकदीने यशस्वी करून दाखविण्याचे काम ना. संजय बनसोडे यांनी केले. या दौऱ्यात  महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ना. बनसोडे यांच्या कार्याचे उपस्थित जनसमुदायासमोर कौतुक केले. 

राष्ट्रपती यांच्या दौऱ्यामुळे उदगीर मतदार संघात तर ना. संजय बनसोडे यांची छबी चांगलीच उजळून निघाली आहे. मात्र राज्य पातळीवर नेतृत्व करण्यासाठी एक वेगळी दिशा मिळाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

टिप्पण्या
Popular posts
उदगीर मतदार संघात आजपासून स्वाभिमान संवाद यात्रा : अजित शिंदे
इमेज
उदगीरचे दोघे भाऊ गाणगापूरच्या नदीत बुडून ठार : सोबतचा एक मित्र जखमी
इमेज
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर माजी नगरसेवक रामेश्वर पवार यांचे उपोषण मागे
इमेज
निलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर मराठवाड्याचे भूषण : ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज