राष्ट्रीय विज्ञान दिन: मराठी विज्ञान परिषदेचाही पुढाकार जिव्हाळा ग्रुपने केला बालवैज्ञानिकाचा सत्कार उदगीर: राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून मराठी विज्ञान परिषद व जिव्हाळा ग्रुपच्या वतीने बालवैज्ञानिक असलेल्या ज्ञानेश्वर दत्ता मंदाडे याचा त्याच्या शिक्षिका कल्पना चौधरी यांच्यासह सत्कार केला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती विजय पाटील होते. मंचावर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, प्रा. डॉ. राहुल आलापुरे, देवीदासराव नादरगे, श्रीकांत पाटील, अरुणा भिकाने, डॉ. अनिल भिकाने, श्री रमेश खंडोमलके, सौ. अलौकिका यांची उपस्थिती होती. यावेळी विज्ञानातील स्त्रीया या विषयावर बोलताना प्रा. डॉ. राहुल आलापुरे यांनी अनादिकालापासून विज्ञानाच्या क्षेत्रात महिलांचे योगदान मोलाचं असतानादेखील महिलांना उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न आजपर्यंत झाला आहे. डार्विनच्या काळात व तद्नंतर च्या काळात महिला वैज्ञानिक प्रखरतेने पुढे आले असल्याचे सांगत महिला संशोधकांनी अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत. कल्पना चावला सारख्या अनेक महिला संशोधकांनी विज्ञानाला वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. नोबेल पारितोषिक आजपर्यंत फक्त 20 महिलांना मिळाले आहे ही खेदाची बाब असून महिला संशोधकांसाठी शासनाकडून राष्ट्रीय पातळीवर संशोधन केंद्र उभी करण्याची गरज आहे असे मत प्रा. राहुल आलापुरे यांनी यावेळी व्यक्त केले. मुख्याधिकारी भारत राठोड यांनी समाजाचे देणे लागतो या भावनेतून जिव्हाळा ग्रुपचे कार्य चालू असल्याबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल भिकाने यांनी केले, सूत्रसंचालन सुभाष तगाळे यांनी तर आभारप्रदर्शन देविदासराव नादरगे यांनी केले. यावेळी विश्वनाथ मुडपे, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर,अमृत देशपांडे, वैजनाथ पंचगलले, चंद्रकांत रोडगे, वैजनाथ साबणे, रमाकांत बनशेळकीकर, सुधाकर वायचळकर आदी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
' त्या' उदगीरला आल्या, महिलांशी संवाद साधला अन महिलांची मने जिंकून गेल्या....
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*चिमुकल्यांसाठी ना.संजय बनसोडे यांची सायकलस्वारी*
इमेज