आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
Popular posts
पत्रातून ह्रदय उलगडते – अरविंद जगताप
• विक्रम हलकीकर
*श्री भगवान परशुराम जन्मोत्सव घरातच साजरी करावी:-*
• विक्रम हलकीकर
मानक कार्यप्रणाली(SOP) सुरू करणाऱ्या बाजार समित्यांचे व्यवहार 21 एप्रिल पासून सुरु करण्याची परवानगी द्यावी -पालकमंत्री अमित देशमुख
• विक्रम हलकीकर
माजी पं. स. सदस्य मुरलीधर अंचूळे यांचा सत्कार
• विक्रम हलकीकर
नारायणराव देशपांडे यांचे निधन
• विक्रम हलकीकर
Publisher Information
Contact
nilsamachar@gmail.com
9403012041
Brahman galli udgir
About
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn