आजपासून युवक कॉंग्रेसचे रक्तदान शिबीर : इच्छुकांनी संपर्क साधावा विजय निटूरे यांचे आवाहन उदगीर : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच महाराष्ट्रात रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा युवक काँग्रेसच्या पुढाकारातून शासनाचे नियम पाळून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक रक्तदात्यांनी संपर्क साधावा असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे यांनी केले आहे. आज परिस्थितीत रक्ताचा तुटवडा उद्धभवलेला आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख , पालकमंत्री अमित देशमुख साहेब, आ. धिरज देशमुख व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काॅंग्रेसच्या वतीने आज दि. 30 मार्च 2020 पासून दि. 2 एप्रिल 2020 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे रक्तदान शिबीर नागाप्प अंबरखाने ब्लड बॅंक उदगीर येथे आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक रक्तदात्यांनी संपर्क साधावा, शासनाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन न करता हे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी व सर्व युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहभाग या शिबिरात अपेक्षित असल्याचे विजय निटूरे यांनी सांगितले.