कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निलंग्यात 121 जणांनी केले रक्तदान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा
निलंग्यात 121 जणांनी केले रक्तदान
• निलंगा : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात रक्ताचा तुटवडा मोठया प्रमाणात जाणवत असल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोंपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत निलंगा शहरात 121 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
• युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी आरोग्य मंत्री टोंपे यांचे आवाहन गांभीर्याने घेत राम नवमी दिवशी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम सकाळी अरविंद पाटील यांनी रक्तदान केले.त्यानंतर त्यांच्या टीम मधील अनेकांसह शहरातील १२१ जणांनी यावेळी रक्तदान केले. 
• या शिबिरात रक्तदान करण्यासाठी प्रत्यक्षात ४०० जणांनी आयोजकाकडे नोंदणी केली होती.परंतु सोशियल डिस्टनसिंगची अडचण येवू नये म्हणून गुरुवारी पहिल्या टप्प्यात १२१ जणांनी रक्तदान केले. या शिबिरात पोलीस कॉ. शीतल सिंदाळकर, मरपल्ले यांनीही रक्तदान केले. अनिल अग्रवाल यांनी रक्तदात्यासाठी निलंगा राईसची सोय केली होती.
• यावेळी तहसीलदार गणेश जाधव,नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,वैद्यकिय अधिक्षक डाँ.दिलीप सौंदळे,डाँ.प्रल्हाद सोळुंके,डाँ.उध्दव जाधव, डाँ.शेषेराव शिंदे,अनिल अग्रवाल,विनोद सोनवणे,परमेश्वर शिंदे, उत्तम शेळके,अँड.गोपाळ इंगळे,शाहूराज पाटील,किशोर जाधव आदी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने मोफत मास्क वाटप उदगीर(प्रतिनिधी) वेळोवेळी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यातअग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ उदगीर सेट्रलच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून भाजी विक्रेत्यांना व बारा महिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषद मैदानावरील भाजीविक्रेते व शहर पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दत्ता पाटील, रो. विशाल जैन, रो. प्राचार्य व्ही.एस कणसे, रो. प्रशांत मांगुळकर, रो. रवी हासरगुंडे, रो. विजयकुमार पारसेवार इ.रोटरीचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज