आ. निलंगेकर यांच्या पुढाकारातून राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे आयोजन लॉकडाऊनच्या कार्यकाळात डिजिटल आंबेडकर जयंती

आ. निलंगेकर यांच्या पुढाकारातून राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे आयोजन 


लॉकडाऊनच्या कार्यकाळात डिजिटल आंबेडकर जयंती 


निलंगा : माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर कायमच महापुरुषांच्या अभूतपूर्व जयंती साजरी करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. आताही लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित अभिनव उपक्रम त्यांनी आयोजित केला आहे. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीच्या निमित्ताने सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्यांच्या विचारांवर आधारित लेखन स्पर्धा या सप्ताहात आयोजित करण्यात आली आहे.
सर्व उदयोन्मुख लेखक, विचारवंत आणि युवकांनी सहभागी होण्यासाठी व नोंदणीसाठी लिंक देण्यात आली आहे . (https://bit.ly/vichardhara)
लेख जमा करण्याची अंतिम तारीख २१ एप्रिल व निकालाची तारीख २५ एप्रिल आहे.
या स्पर्धेतील विजेत्यास  २१हजार रुपये ,उपविजेत्यास  ११००० हजार रुपये , तिसरे पारितोषिक ५ हजार रुपये ( दोघांना )तर २हजार १०० रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक 5 जणांना दिले जाणार आहेत .
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास व्हावा , त्यातून प्रेरणा मिळवी आणि आपल्या समाजात सकारात्मक परिवर्तन व्हावे या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
या स्पर्धेसाठी  लेखनाची शब्दमर्यादा १हजार ५०० शब्द एवढी आहे .
वयोगटाला बंधन नाही .मराठी,हिंदी,इंग्रजी भाषातून लेख लिहिता येणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे .
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक आणि प्रेरणादायी विचारांनी प्रेरित होण्याची आवश्यकता निर्माण झाली असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित ही लेखन स्पर्धा नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण करेल असा विश्वास संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे. सर्वांनी लिंक वर आपली लेखन कला प्रकाशित करावी, आपले विचार मांडावे आणि सकारात्मक साखळी निर्माण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
याच वर्षी दुष्काळमुक्तीचा “शिवसंकल्प” घेण्यासाठी एक उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. मागच्या वर्षी शेतीच्या बिजांच्या रोपण प्रक्रियेतून कृत्रिम उपग्रहावरून (Satellite) दिसेल एवढी भव्य “हरित शिवप्रतिमा” निर्माण करून जागतिक कीर्तीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता. 
या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना आ.संभाजीराव पाटील निलंगेकर सांगतात म्हणाले की , भविष्यामध्ये जर मोठे कार्य करायचे असेल तर इतिहासातून प्रेरणा घ्यावी लागते. आपल्याच देशातील अनेक महापुरुषांनी किती प्रतिकूल परिस्थिती मध्ये संघर्ष करून सकारात्मक बदल घडवून आणला हे त्यांच्या जीवनाच्या अभ्यासातून कळते. जयंती साजरी करणे हे त्या अभ्यासासाठीचे निमित्त आहे. 
आजच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सकारात्मकता निर्माण करायची असेल तर नागरिकांना सकारात्मक उपक्रमामध्ये सहभागी केले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक विचारातून सकारात्मक वातावरणनिर्मिती होऊन निश्चित चांगल्या विचारांची एक साखळी निर्माण होऊ शकेल असे ते म्हणाले .
या उपक्रमासाठी निवडण्यात आलेल्या विषयात आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षण व्यवस्थेबाबत नवा दृष्टिकोन, 
आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अवतरले तर..? 
आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील भारत.  समता, बंधुता आणि एकता यासाठी माझे योगदान. 
आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार मी कसा अमलात आणला ?,आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रक्रियेतून स्त्री सशक्तीकरण आदींचा समावेश आहे .
मराठी, हिंदी किंवा इंग्रजी तीनही भाषेमधून सहभाग नोंदविता येणार असल्याने अधिकाधिक लेखक यामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत .


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*