उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना "मास्क" चे वाटप. :- संपूर्ण महाराष्ट्रात अनोखे उदाहरण ,पत्रकाराच्या मदतीला धावला पत्रकार संघ: उदगीर

उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना "मास्क"  चे वाटप.
:- संपूर्ण महाराष्ट्रात अनोखे उदाहरण ,पत्रकाराच्या मदतीला धावला पत्रकार संघ
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने शहरातील  पत्रकारांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर गुरूवारी मास्क वाटप करण्यात आले.
   देशात सर्वत्र कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. या दरम्यान सामाजिक दृष्टिकोनातून माध्यमांचे प्रतिनिधी घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. वार्तांकन करणा-या पत्रकारांना कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव होण्यापासून रोखण्यासाठी उदगीर तालुका पत्रकार संघा तर्फे गुरूवारी सकाळी ११ वा. पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे यांच्या हस्ते नगर परिषद व्यापारी संकुल येथे शहरातील ५० पत्रकारांना V 44(ISO) मास्क  वाटप करण्यात आले. यासाठी डॉ. योगेश अशोक कप्ते यांनी सहकार्य केले. लवकरच सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष राम मोतीपवळे यांनी सांगितले.