आठ पॉझिटिव्ह यात्रेकरू पैकी तीन व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह तर एकाचा प्रलंबित

*आठ पॉझिटिव्ह यात्रेकरू पैकी तीन व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह तर एकाचा प्रलंबित


*आठ पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 26 डॉक्टर्स, नर्स, वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांपैकी 25 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह तर एकाचा प्रलंबित


*आजपर्यंत  एकुण 43 व्यक्तींचा Home Quarantined  कालावधी संपला



लातूर, दि.8:-  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 08.04.2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 4.00 पर्यंत एकुण 46 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन आजतागायत एकुण 140 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात  आले होते. त्यापैकी एकूण 103 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यापैकी दिनांक 04.04.2020 रोजी  8 व्यक्तींचे अहवाल positive आलेले आहेत. दिनांक 07.04.2020 व दिनांक 08.04.2020 रोजी  34 व्यक्तींचे   स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 26  स्वॅब   Positive व्यक्तीच्या संपर्कात आलेले डॉक्टर्स, नर्सेस, वर्ग 4 कर्मचारी व अतिदक्षता विभागात असलेल्या 2 व्यक्तीं असे एकूण 25 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एक  व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे  ही दिलासादायक बाब आहे.
यापूर्वी positive अहवाल आलेल्या 8 व्यक्तींचे स्वॅब फेरतपासणी साठी दिनांक 07.04.2020 रोजी पाठविण्यात आले होते त्यापैकी 4 व्यक्तींची पहिली चाचणी निगेटिव्ह आलेली आहे.  त्याच व्यक्तीचे स्वॅब दिनांक 08.04.2020 रोजी फेरतपासणी साठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 3 व्यक्तींची दुसरी चाचणी निगेटीव्ह आलेली आहे व एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे ही लातूर करांसाठी दिलासादायक बाब आहे.
आजपर्यंत  एकुण 43 व्यक्तींचा Home Quarantined  कालावधी संपला आहे व इतर 53 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantined मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे व इतर 11 व्यक्तींना Institutional Quarantined मध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच 37 व्यक्तींना  या संस्थेच्या विलगीकरणं कक्षात ठेवण्यात आले आहे अशी माहिती डॉ. मारुती कराळे कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी दिली.
 
सद्यस्थितीत लातूरकराना  दिलासा मिळाला असून कोणीही घाबरून  जाऊ नये. तसेच  अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. शासनाने वेळोवेळी  दिलेल्या  सूचनांचे पालन करावे.  प्राथमिक तपासणी नंतर COVID-19 आजारा सारखी लक्षणे आढळल्यास किंवा कोरोना बाधित / संशयित व्यक्तींचा संपर्क झाला असेल तर अशा व्यक्तींना व प्रवाशांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर येथील कोरोना विलगीकरण कक्षात तपासणीसाठी पाठविण्यात यावे असे आवाहन डॉ. गिरीष ठाकुर  अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर यांनी केले आहे. 
          **********


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
' त्या' उदगीरला आल्या, महिलांशी संवाद साधला अन महिलांची मने जिंकून गेल्या....
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*चिमुकल्यांसाठी ना.संजय बनसोडे यांची सायकलस्वारी*
इमेज