बसव जयंती घरातच साजरी करावी

बसव जयंती घरातच साजरी करावी



उदगीर (प्रतिनिधी) लिंगायत धर्मांचे  संस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची ९१५ वी जयंती रविवार  दि.२६ एप्रिल २०२० रोजी असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जयंती घरीच साजरी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
उदगीर शहरात मोठ्या थाटामाटात व आंनदात प्रतिवर्षी जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने कोणतेही सार्वजनिक स्वरूपाचे कार्यक्रम होणार नसून रविवारी बसवभक्तांनी ही जयंती घरातच पुजा, प्रार्थना, पाळणा व वचन साहित्यांचे वाचन करून साजरी करावी असे आवाहन म. बसवेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती व वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे यांनी केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
प्रभाग 8 मध्ये निर्जंतुकिकरणाची फवारणी उदगीर:
इमेज
महमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ५१ जनांचे रक्तदान.    मुव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टीस चा उपक्रम.  
इमेज
लॉयनेस क्लब गोल्ड च्या अध्यक्षपदी सौ. संगीता नेत्रगावे पाटील यांची निवड.*
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
मराठी राजभाषा दिनानिमित्त उदयगिरीत 28 फेब्रुवारीला ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकरांचे व्याख्यान
इमेज