महात्मा पब्लिक स्कूल तर्फे पोलिसांना मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप दक्षता समिती सदस्या संगीता नेत्रगावे यांचा पुढाकार

महात्मा पब्लिक स्कूल तर्फे पोलिसांना मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप
दक्षता समिती सदस्या संगीता नेत्रगावे यांचा पुढाकार
उदगीर: येथील सार्थक मेडिकल व महात्मा पब्लिक स्कुल तर्फे ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीर येथे दक्षता समितीच्या सदस्या संगीता नेत्रगावे यांच्या पुढाकारातून पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना रुमाल,मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले.
पोलिस बांधवाना उन्हाळ्यात बाहेर फिरावे लागते म्हणून डोक्याला बांधण्यासाठी मोठे रुमाल व मास्क व सॅनिटायझर्सचे ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सोपान सिरसाठ यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक सार्थक मेडिकल चे दिपक नेत्रगावे, महात्मा पब्लिक स्कुल चे अध्यक्ष विश्वास पडिले, सचिव तथा महिला दक्षता समितीच्या सदस्या संगीता दिपक नेत्रगावे सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अभिजीत औटे, लॉयनेस क्लब उदगीर अध्यक्षा तथा महिला दक्षता समितीच्या सदस्या दिपाली औटे, व्यापारी सुशिल पेन्सलवार, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा सुरेखा हाके, उपाध्यक्ष ज्योती कोळनूरे, सचिव अनुराधा गोपे, केंद्रे उपस्थित होते.


Popular posts
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.
Image
उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड
बेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता
बँकांनी कर्जदारांकडून  कर्जाची वसुली सक्ती करु नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 
Image
*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏
Image