पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो खरा.............राहुल केंद्रे* पोलिसांना साथ देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांचे जनतेला भावनिक आवाहन उदगीर / लातूर प्रतिनिधी


*पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो खरा.............राहुल केंद्रे*


पोलिसांना साथ देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांचे जनतेला भावनिक आवाहन 


उदगीर / लातूर
प्रतिनिधी


जनतेच्या जीवाला जेव्हा घोर असतो, तेंव्हा त्या संकटाला रोखण्यासाठी एकच चेहरा समोर असतो. तो म्हणजे खाकी वर्दीतला पोलीस.!


पोलिस कर्मचारी आपले मित्र आहेत, अशा संकटातही जनतेसाठी ते रस्त्यावर आहेत. पोलीसांच्या सुचनाचे पालन करा, संचारबंदीत विनाकारण घराच्या बाहेर पडू नका असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी केले आहे.


समाजासाठी असो कि देशासाठी असो, पोलिसांचे बलिदान प्रत्येकांनी पाहिले आहे. आई-बहीनींची अब्रृ राखणारे पोलिस, तर कधी जनतेच्या रक्षणासाठी राबणारे पोलीस, पोलीसच न्याय व्यवस्थेची खरी डोर असतो आणि समाजाच्या भल्यासाठीच त्यांचा जोर असतो. त्यामूळे पोलिसांशी सौजन्याने वागा, त्यांची ड्युटी त्यांना करु द्या, विनाकारण तंटा वाढवू नका, आपल्या सुरक्षेसाठी आज ते घरदार सोडून, आपला परिवार सोडून रस्त्यावर आहेत. अशा भावना अध्यक्ष केंद्रे यांनी व्यक्त केलेल्या आहेत. 


कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदी संदर्भात जनतेला गांभिर्य नसल्याचे चित्र काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. त्यामूळे, कूणीही संचारबंदीत पोलीस कर्मचाऱ्यांशी हूज्जत घालू नका, आपले घरदार सोडून जनतेच्या रक्षणासाठी पोलीस आज रस्त्यावर आहेत, आपल्याला रोगाची लागण होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घातला आहे. अशा पोलीसांना मदत करा, त्यांच्या आदेशाचे पालन करा, संचारबंदीचे उल्लंघन करु नका. असेही राहूल केंद्रे यांनी जनतेला आवाहन केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
राष्ट्रपतींचा दौरा ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला दिशा देणार...!
इमेज
माझं ठरलंय ....! : माजी खासदार सुधाकर शृंगारे
इमेज
*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण* *क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन
इमेज