निवासी मतिमंद विद्यालयाकडून दिव्यांगाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप
उदगीर : या तालुक्यातील नळगीर येथील निवासी मतिमंद विद्यालयांच्या वतीने दिव्यांग मुले, व्यक्ती यांना जिवन आवश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लोकडाऊन करण्यात आल्याने दिव्यांग मुले व व्यक्तींची मोठी अडचण झाली आहे. ही अडचण समजून घेत नळगीर येथील निवासी मतिमंद विद्यालयाचे संस्थापक देवीदासराव नादरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षकांनी दिव्यांग व्यक्ती व मुलांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. यावेळी मुख्याध्यापक भरत नादरगे, पठाण,मुस्कावाड, राठोड व पांचाळ उपस्थित होते.
निवासी मतिमंद विद्यालयाकडून दिव्यांगाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप
addComments
टिप्पणी पोस्ट करा