धान्याचा अपहार प्रकरणी स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द

धान्याचा अपहार प्रकरणी स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द


उदगीर: शहरातील किल्ला रोड भागातील एपीजे अब्दुल कलाम महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानदाराने औसा येथे घरातच स्व विलगीकरण करून घेतलेल्या एका कुटुंबाचे धान्य परस्पर उचल्या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मंगळवारी निलंबनाची कारवाई केली आहे.
या स्वस्त धान्य दुकानदाराचा एक लाभार्थी लोकडाऊनमुळे औसा येथे अडकून पडला आहे. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते स्वतःला घरातच विलीगीकरण करून घेतले आहेत. यामुळे त्यांनी याकाळात उदगीर येथे जावून धान्य उचलणे शक्य नसल्याने औसा येथे धान्य उचलण्यासाठी पुरवठा विभागाशी संपर्क केला.  या कुटुंबाला धान्य देण्यासाठी ऑनलाइन तपासले असता उदगीरच्या दुकानदाराने परस्पर धान्य उचलल्याचे प्रकरण पुढे आले. यामुळे या कुटुंबाने याची रीतसर तक्रार संबंधित विभागाकडे केल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार व औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या आदेशावरून या प्रकरणाची चौकशी नायब तहसीलदार राजाभाऊ खरात यांनी केल्यानंतर सदर दुकानदाराने अपहार केल्याचे तपासात पुढे आले. या प्रकरणी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी तसा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविल्यानंतर तो अहवाल ग्राहय धरून त्यांनी निलंबनाची कारवाई केली.  या प्रकरणी साथ रोग नियंत्रण कायदा व अन्न सुरक्षा कायद्यानुसार या दुकानदारावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले आहेत. शिवाय कार्डधारकांची गैरसोय टाळण्यासाठी जवळपासच्या दुकानदारांकडे पर्यायी सोय करावी असेही आदेशीत केले आहे.


Popular posts
*महासंस्कृती महोत्सव अंतर्गत 'मराठी बाणा' कार्यक्रमाला उदगीरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद* ▪️क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Image
15 फेब्रुवारी रोजी उदगीर येथे महाविकास आघाडीचा महामोर्चा
Image
केंद्रीय मंत्री रुपाला 29 जानेवारी रोजी उदगीरात उदगीरची अस्मिता असलेल्या दूध डेअरीची पाहणी करणार : खा. शृंगारे यांची माहिती
Image
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
Image