उदगीरच्या 17 जणांच्या स्वॅब तपासणीत 10 पॉझिटिव्ह, 4 निगेटिव्ह तर तिघांचे अहवाल प्रलंबित

उदगीरच्या 17 जणांच्या स्वॅब तपासणीत 10 पॉझिटिव्ह, 4 निगेटिव्ह तर तिघांचे अहवाल प्रलंबित
लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 96 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. 
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत व 3 व्यक्तीचे अहवाल ( Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 7 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 7 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रेणापूर येथील 1 व्यक्तीच्या स्वॅबची तापसणी करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उस्मानाबाद येथील 61 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 58 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 2 व्यक्तीचे अहवाल ( Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व एका व्यक्तीचा स्वॅब परिपुर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे व बीड येथील 10 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 8 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत असे एकूण 12 पॉझिटिव्ह, 78 निगेटिव्ह, 5 (Inconclusive) व 1 Reject अहवाल आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज