उदगीरच्या 33 जणांची स्वॅब तपासणी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह: चिंता वाढली

उदगीरच्या 33 जणांची स्वॅब तपासणी
पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह: चिंता वाढली
उदगीर : आज विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 33 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 28 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उदगीरच्या कोरोना बधितांची संख्या आता 27 वर पोहोचली असून चिंता वाढत आहे. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर न येता काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आज तपासण्यात आलेल्या 33 जणांमध्ये 3 डॉक्टरांच्या स्वॅबची पुनर्तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड 11, उस्मानाबाद 3, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 4 असे एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 46 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.
 
 
     
         
.


टिप्पण्या
Popular posts
लॉयनेस क्लब गोल्ड च्या अध्यक्षपदी सौ. संगीता नेत्रगावे पाटील यांची निवड.*
इमेज
प्रभाग 8 मध्ये निर्जंतुकिकरणाची फवारणी उदगीर:
इमेज
महमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ५१ जनांचे रक्तदान.    मुव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टीस चा उपक्रम.  
इमेज
मराठी राजभाषा दिनानिमित्त उदयगिरीत 28 फेब्रुवारीला ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकरांचे व्याख्यान
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज