उदगीर येथील 51 व्यक्तींचे स्वॅब नमुने निगेटिव्ह
लातूर :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 02 मे ब2020 रोजी एकूण 53 व्यक्तींचे स्वॅब (कोविड 19) तपासणी साठी आले होते. हे सर्व 51 व्यक्तीचे स्वॅब उदगीर येथून आले होते. त्यापैकी 31 व्यक्ती पॉझिटिव्ह व्यक्तीवर उपचार केलेले डॉक्टर्स, नर्सेस, व त्यांच्या संपर्कात आलेले सफाईगार व इतर कर्मचारी यांची पाचव्या दिवशी पुनर्तपासणी करण्यात आली या सर्व 31 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. ही बाब आरोग्य यंत्रणेसाठी अत्यंत दिलासादायक आहे. उर्वरित 20 व्यक्ती ह्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या / मयत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या होत्या त्या सर्व व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी केली असता त्या सर्व 20 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील दोन व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी केली असता त्या दोन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. सद्यस्थितीत एकही अहवाल प्रलंबित नाही अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीष ठाकूर यांनी दिली.
उदगीर येथील 51 व्यक्तींचे स्वॅब नमुने निगेटिव्ह