उदगीरमध्ये कोरोनाचा तिसरा बळी चिंता वाढू लागली: लोणीतील 78 वर्षीय व्यक्ती

उदगीरमध्ये कोरोनाचा तिसरा बळी


चिंता वाढू लागली: लोणीतील 78 वर्षीय व्यक्ती


उदगीर : उदगीर शहर व तालुक्यात कोरोनाचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत असताना काल शहरालगत असलेल्या लोणी येथील एका 78 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे.


लोणी ता. उदगीर 78 वर्षीय व्यक्ती शुक्रवारी दुपारच्या सुमारास उपचाऱ्यासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. या व्यक्तीला पूर्वीपासून अन्य आजाराने ग्रासलेले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एक तासातच सदरील व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट झाले नव्हते. मृत्यूनंतर सदरील व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी केल्यानंतर त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.


लोणी येथील मयताच्या घराचा परिसर सील करण्यात आला असून नेमका संसर्ग कोठून झाला याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे.


उदगीर शहरात यापूर्वी एका 70 वर्षीय महिलेचा व 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील आता ही कोरोनाने मृत्यू होण्याची तिसरी घटना आहे. या घटनेनंतर तालुक्यात पुन्हा एकदा भयाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


टिप्पण्या
Popular posts
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज